YouTuber Devraj Patel Died: ‘भाई दिल से बुरा लगता है’ फेम देवराज पटेलचा रस्ते अपघातात मृत्यू
Devraj Patel Died: ‘भाई दिल से बुरा लगता है’ या व्हिडिओमधून सोशल मीडियावर प्रसिद्ध कॉमेडियन यूट्यूबर देवराज पटेल यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर, सर्वांना हसवणारा देवराज पटेल (Devraj Patel Accident) याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. (YouTuber Devraj Patel Died) रायपूरमधील तेलीबंधा पोलीस (Telibandha Police) स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. देवराजच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
“दिल से बुरा लगता है” से करोड़ों लोगों के बीच अपनी जगह बनाने वाले, हम सबको हंसाने वाले देवराज पटेल आज हमारे बीच से चले गए.
इस बाल उम्र में अद्भुत प्रतिभा की क्षति बहुत दुखदायी है.
ईश्वर उनके परिवार और चाहने वालों को यह दुःख सहने की शक्ति दे. ओम् शांति: pic.twitter.com/6kRMQ94o4v
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 26, 2023
मिळालेल्या माहितीनुसार देवराज त्याच्या मित्रासोबत बाईकवरून जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, त्यांची दुचाकी भरधाव वेगात असलेल्या ट्रॅकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात देवराजचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.
देवराज सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचा. देवराजचेही यूट्यूबवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत. यूट्यूच्या माध्यमातून तो लोकांना हसवण्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बनवत असत. देवराज यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे.
देवराज हा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता. जो त्याच्या ‘भाई दिल से बुरा लगता है’ व्हिडिओसाठी प्रसिद्ध होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही देवराज यांची भेट घेतली. त्याचवेळी, मृत्यूपूर्वी देवराजने त्यांच्या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ मृत्यूच्या चार तास आधीचा आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना बाय करताना दिसत होता.
देवराज पटेल कोण आहे? (Who Is Devraj Patel)
देवराज हा महासमुंद जिल्ह्यातील दाब पाली या गावचा रहिवासी आहे. त्यांचे कुटुंबीय आज देखील या गावामध्येच राहतात. देवराजच्या वडिलांचे नाव घनश्याम पटेल आहे, ते शेती करतात. तर देवराजला एक भाऊ असून त्याचं नाव हेमंत आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या देवराजची आई गृहिणी आहे. देवराजने २०२१ मध्ये लोकप्रिय युट्यूबर भुवन बामसोबत ‘धिंडोरा’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तसेच छत्तीसगड सरकारच्या माहितीपटात देखील त्याने काम केलं होतं. गेल्या वर्षी त्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबरोबर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आता त्याच्या निधनावर भूपेश बघेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.