Madras High Court : धोनीवर आरोप करणं भोवलं; IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांचा तुरूंगवास

  • Written By: Published:
Madras High Court : धोनीवर आरोप करणं भोवलं; IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांचा तुरूंगवास

चेन्नई :  मद्रास उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संपत कुमार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून, हे प्रकरण आयपीएल 2013 मध्ये उघडकीस आलेल्या सट्टेबाजी प्रकरणाशी संबंधित असून, त्यावर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे. (Madras high court sentences IPS officer Sampath Kumar to 15 days jail on MS Dhoni’s contempt of court plea)

नेमकं प्रकरण काय? 

धोनीने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यात त्याने मीडिया चॅनल, अधिकारी आणि अन्य काही लोकांनी त्याच्यावर आयपीएल 2013 मध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केल्याचा उल्लेख केला होता. याचिकेत धोनीने आरोप करणाऱ्यांवर निराधा आरोप न करण्याची विनंती केली होती. त्याबाबत न्यायालयाकडूनदेखील निराधार आरोप न करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले होते. मात्र, संपत कुमार वगळता अन्य व्यक्तींनी आदेशाचे पालन केले.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने अखेर मद्रास उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्याला 15 दिवासांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आलेल्या अधिकाऱ्याला उत्तर दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ तुरुंगात टाकले जाणार नाहीये.

BCCI चा मोठा निर्णय! सचिनप्रमाणेच धोनीचा सन्मान; सात नंबरची जर्सी निवृत्त

धोनीच्या नावावर 3 आयसीसी ट्रॉफी 

धोनीच्या नावावर 2007 T20 विश्वचषक, 2011 विश्वचषक, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशा 3 ICC ट्रॉफी आहेत. अशा प्रकारे तीन ट्रॉफी मिळवणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर 5 आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचाही विक्रम आहे. एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा (नाबाद 183) करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. हा विक्रम 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळताना करण्यात आला होता.

विकेटच्या मागे उभे राहून अनेक विक्रम 

ट्रॉफी आणि रनांच्या विक्रमांशिवाय धोनीच्या नावावर विकेटच्या मागे उभा असतानाही अनेक विक्रम केल्याची नोंद आहे. यात एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक स्टंप (3 वेळा) करण्याचा विक्रम अनेक खेळाडूंच्या नावावर आहे. मात्र धोनीने हा पराक्रम दोनदा केला आहे.माहीने त्याच्या T-20 कारकिर्दीत 98 सामन्यांत 91 विकेट घेतल्या आहेत. त्यात 34 स्टंपिंगचा समावेश असून, धोनीने सर्व फॉरमॅटमध्ये 538 सामन्यांमध्ये 195 स्टंपिंग केले आहेत जे सर्वाधिक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube