‘किर्तन थांबवलं नाही, हल्ला नाही, तोडफोड नाही!’ भंडारे महाराज प्रकरणी बाळासाहेब थोरातांचं स्पष्टीकरण

Balasaheb Thorat Answer To Sangram Bapu Bhandare : संगमनेर येथील घुलेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी ( Balasaheb Thorat) म्हटलंय की, एक पथ्य पाळलं पाहिजे. वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी त्यांनी राजकारणावर जावू नये. स्थानिक राजकारणावर (Amol Kharat) भाष्य करू नये. कोणासाठी त्यांचं राजकीय बोलणं नसावं. हे तर साहाजकिपणे आहे, आपल्या राज्यघटनेचे जे मुलभूत तत्वे आहेत. त्याला ठेच पोहोचेल, असं वक्तव्य कोणत्या किर्तनकाराचं नसावं. दुर्दैवाने ही तत्वं पाळली जात नसल्याचं दिसतंय.
बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही
राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही, हा अधिकार अशा महाराजांना तर नक्कीच नाही. ते जे मांडणी करतात, ती अत्यंत चुकीची पद्धत असते. त्यांनी राजकारणात भाग घेवू नये, असा देखील इशारा बाळासाहेब थोरात यांनी हभप संग्राम भंडारे महाराजांना दिलं आहे.
Maharashtra Rains Update : पुणेकरांनो सावधान; खडकवासल्यातून 12 हजार क्युसेकने विसर्ग
हे तथाकथित महाराज
घुलेवाडीमध्ये किर्तन सुरू असताना ते मूळ विषय सोडून स्थानिक राजकारणावर बोलायला लागले. त्यांनी नकारात्मक बोलण्यास सुरूवात केल्यानंतर, एक युवक म्हटला की मूळ महाराज अभंगावर बोला. यावर महाराजांनी काय-काय वक्तव्य केलंय. हे तथाकथित महाराज आहेत. खऱ्या वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे, तिच्यात काही नवीन राजकारण करण्यासाठी घुसले, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भंडारे महाराजांना लगावला आहे. त्यांचं कोणीही किर्तन थांबवलं नाही, त्यांच्यावर कोणताही हल्ला झालेला नाही, गाडीची तोडफोड केली नाही. खोट्या केस सुरू झाल्या आहेत.
मी महात्मा गांधी नाही…
संगमनेरमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि महाराज हे कोणाच्या तरी हातचं खेळणं बनलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. नथुराम गोडसे व्हावं लागेल, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, असं बलिदान मी हसत हसत घेईल. मी महात्मा गांधी नाही. परंतु विचारासाठी बलिदान आनंदाची स्वीकारण्याची माझी तयारी आहे. खोटे आरोप टाकून युवकांचा छळ करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस पूर्णपणे दबावाखाली आहे. दुर्दैवाने ही यंत्रणा एका फोनखाली वागत आहेत.
मुंबईत भरदिवसा काळोख… पुढचे 4 तास अतिधोक्याचे, प्रशासनाकडून नागरिकांना महत्वाचं आवाहन
आम्ही पक्के हिंदू
आम्ही पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदायात राहिलो आहेत. आम्ही पक्के हिंदू आहोत, फक्त आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. मानवधर्म मानणारे आम्ही आहोत. द्वेषाचं राजकारण सत्तेकरिता चाललेला त्यांचा खेळ आहे, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटला. निवडणुका आल्यानंतर दंगली केल्या की, मतं साकाळतात. त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत. सुरूवात संगमनेरपासून केली आहे, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची आहे.