20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या

20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या

Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी(Sukhdev Singh Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोगामेडी यांच्यासह इतर दोघांवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुखदेव सिंह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होती. याचदरम्यान अज्ञात दुचाकीवर येत त्यांनी हल्ला केला आहे. घटनेनंतर सुखदेव सिंह यांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केलं आहे. या घटनेमुळे राजस्थानात एकच खळबळ उडाली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सुखदेव सिंह गोगामेडी यांनी राजस्थानात राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचं मोठं संघटन उभारलं आहे. सुखदेव सिंह गोगामेडी करणी सेनेचे अध्यक्ष होते. करणी सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. हिंदी चित्रपट पद्मावत, गॅंगस्टार आनंदपाल यांच्याविरोधातील आंदोलनात त्यांचं नाव अग्रस्थानी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहेत.

‘मतदार सगळं पाहतोयं, निवडणुकीत उत्तर मिळणार’; भाजप पदाधिकाऱ्याचा घरचा आहेर

विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करणारे नेते म्हणून सुखदेव सिंह गोगामेडी यांची ओळख होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुखदेव सिंह गोगामेडी यांनी सरकारकडे आपल्या सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी मान्य नसल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.

नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा : PM मोदींची मोठी घोषणा

दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर राजस्थानात पोलिसांकडून तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांना चार गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारे कोण होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज