‘मतदार सगळं पाहतोयं, निवडणुकीत उत्तर मिळणार’; भाजप पदाधिकाऱ्याचा घरचा आहेर
Arun Munde : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस अरुण मुंडे(Arun Munde) व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्या विरोधात वाळूसाठा चोरीचा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपची सत्ता असून याठिकाणी मोनिका राजळे(Monika Rajale) या लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यावर साधा फोन देखील केला नाही. मात्र हे सगळं षडयंत्र मतदार पाहत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत याचे उत्तर नक्की मिळणार अशा शब्दांत अरुण मुंडे यांनी नाव न घेता आमदार मोनिका राजळे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला.
इंडिया आघाडीत मिठाचा खडा, ममता बॅनर्जींनी केला काँग्रेसवर हल्लाबोल
यावेळी बोलताना अरुण मुंडे म्हणाले, माझ्यासह माझ्या बंधूंवर वाळू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय आकसातून करण्यात आल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला आहे. षडयंत्र करून दाखल करण्यात आलेला हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शेवगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच खोटा गुन्हा’; गुन्हा मागे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचा मोर्चा
ते म्हणाले, पक्षातल्या पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे जाणीवपुर्वक दाखल करणाऱ्यांनी 2014 आणि 2019 ला सत्ता कुणामुळे मिळाली हे लक्षात ठेवून घमेंड करू नये असा सडेतोड इशाराच दिला आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील जनता याचा योग्यवेळी समाचार घेईल असेही अरुण मुंडे यांनी सांगत आपण काढलेल्या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिल्याचे सांगितले.
अहमदनगरमधील शेवगावात भाजपच्या गोटात नेहमीच कलह दिसून आलेला आहे. अशातच पिंगेवाडीच्या महिला सरपंचांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्कल अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल करुन देत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करणाऱ्या सर्कल अधिकाऱ्याने दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचा दावा अरुण मुंडे यांनी यावेळी केला आहे.
रेल्वेत नोकरीची संधी, तब्बल 1, 104 रिक्त जागांसाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज
मुंडेंच्या मागण्या…
शेवगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना खोटा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून निलंबित करावे तसेच त्यांच्या मालमत्तेची एसआयटी मार्फत चौकशी करावी, आपल्यावर पिंगेवाडी येथील वाळू प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पिंगेवाडीच्या सरपंच व त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या यावेळी त्यांनाही केल्या आहेत.