रेल्वेत नोकरीची संधी, तब्बल 1, 104 रिक्त जागांसाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज
North Eastern Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आताही रेल्वे विभागात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच उत्तर पूर्व रेल्वेने (North Eastern Railway) अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 1104 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Parth Pawar पुन्हा एकदा मावळ लोकसभा लढवणार का ? LetsUpp Marathi
भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2023 आहे. उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण रिक्त पदे– 1104
शैक्षणिक पात्रता –
50% गुणांसह 10वी पास + संबंधित विषयात ITI.
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 15 ते 24 वर्षे.
सरकारी नियमानुसार ओबीसी, एसटी, एससी या वयात सवलत दिली जाणार आहे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
नोकरीचे ठिकाण – उत्तर पूर्व रेल्वे
अधिकृत वेबसाइट – https://ner. indianrailways.gov.in/
आपचा तिन्ही राज्यात फुसका बार ! उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत
अर्ज शुल्क –
खुली श्रेणी – 100 रुपये.
आरक्षित/महिला/पीडब्ल्यूडी – कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करतांना उमेदावारंना ऑनलाईन पध्दतीनं शुल्क भरणं अनिवार्य आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 25 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2023
जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ig6N6UbPERTUnPhphfEii1QYtnOXUJHo/view
अर्ज कसा करावा:
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
-त्यानंतर उमेदवारांनी आपला वैयक्तिक तपशील भरून युजर आयडी तसेच पासवर्ड तयार करावा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
– फॉर्मची एक प्रत डाऊनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.