दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, तब्बल 3 हजार 115 पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Eastern Railway Recruitment 2023: भारतीय राज्यांची नोकरी: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. रेल्वेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3115 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावे लागतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. पूर्व रेल्वे भरती 2023 साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली.
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
एकूण पदांची संख्या– 3115
शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. (पदानुसार शैक्षणिक पात्रता बदलते. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा-
15 ते 24 वर्षे.
सरकारी नियमांनुसार OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत देण्यात येणार आहे.
हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज फी:
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PWD, महिला यांच्याकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करताना उमेदवारांनी शुल्क ऑनलाइन भरणे बंधनकारक असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाइट – http://www.er. indianrailways.gov.in
अटी-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधी वेबसाईटवर जा.
त्यानंतर रिक्रुटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तीक तपशील भरून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन सूचना काळजीपूर्वक वाचा.
निवड प्रक्रिया:
गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1tpd8YwdNBwTU_P2JcuC-xNElm5I–IQq/view