Video : PM मोदींसाठी अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘रमता राम अकेला’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) वाढदिवस. ते आज 72 व्या वर्षातून 73 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने जगभरातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीया, पत्र, सामाजिक सेवा अशा विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. महाराष्ट्रातूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. (Devendra Fadnavis’s wife and banker Amrita Fadnavis has wished PM Narendra Modi through her song)
आधुनिक भारत के शिल्पकार हमारे प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ ! उन्हीं की लिखी कविता ‘रमता राम अकेला’ को गाकर महसूस हुआ की अकेले चलने में भी एक अलग आध्यात्मिकता हैं , एक अलग ही आनंद हैं और देश की सेवा में ही संतोष हैं …..!#nrendramodibirthday… pic.twitter.com/Wbrxv9hD81
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2023
आधुनिक भारताचे शिल्पकार आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांनीच लिहिलेली ‘रमता राम अकेला’ ही कविता गायल्यानंतर मला जाणवले की, एकट्याने पुढे जाण्यात वेगळे अध्यात्म आहे, एक वेगळा आनंद आहे आणि देशसेवा करण्यात समाधान आहे…!, असे म्हणतं त्यांनी त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस :
पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेल्या मोदींनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वडनगरमधूनच केली. ‘चायवाला ते देशाचे पंतप्रधान’ हा त्यांचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच थक्क करणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचं चहाचं दुकान होतं आणि इथेच त्यांनी चहा विकून वडिलांना हातभारही लावला, त्यासोबतच जिद्दीने अभ्यासही केला.
अगदी कमी वयातच मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजेच आरएसएसशी जोडले गेले. आरएसएसचे सदस्य, प्रचारक सुद्धा काम केलं. या काळातच त्यांच्यातील भाषा कौशल्य, राजकारण्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण याची जडणघडण झाली. लक्ष्मणराव इनामदार आणि डॉ. हेडगेवार यांच्या प्रभावामुळे, हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण करण्याची आणि संघाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा मोदींनी घेतली.
भारतात येणार आणखी चित्ते; PM मोदींच्या बड्डेला घोषणा होण्याची शक्यता
त्यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. 2001 ते 2014 पर्यंत सलग चार विधानसभा जिंकत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी देशात अभूतपूर्व अशी मोदी लाट आली आणि देशात सत्तांतर झालं. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली घेतली. पुढे 2019 च्या ही लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिष्मा कायम राहिला. तेव्हा 30 मे 2019 ला मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.