भारतात येणार आणखी चित्ते; PM मोदींच्या बड्डेला घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली : यावर्षाच्या अखेरीसपर्यंत भारतात दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा एकदा चित्ते आयात केले जाणार आहेत. उद्या (17 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयात केलेल्या आणि नवीन जन्म झालेल्या तब्बल 9 चित्त्यांच्या मृत्यूनंतरही आणखी चित्ते आयात केले जाणार असल्याने विरोधकांकडून या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. (Indian government is planning to spend crore of rupees on the import of Cheetahs from South Africa once again)
चित्ता प्रकल्पाचे प्रमुख एसपी यादव यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आयात करून मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात आणले जाणार आहेत. भारत सरकारच्या चित्ता प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 91 कोटी रुपये असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून 50.22 कोटी देणार आहे.
CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी भारतात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर भारतीय भूमीवरही चार बिबट्यांचा जन्म झाला. यापैकी 15 पूर्णपणे निरोगी आहेत तर आतापर्यंत तीन शावकांसह नऊ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. हवामानाशी संबंधित कारणांमुळे तीन शावकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते. बिबट्यांच्या सातत्याने होणाऱ्या मृत्यूंमुळे केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
मोठी बातमी! नगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू; महसूलमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं….
एसपी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च आर्द्रता आणि तापमानामुळे चित्त्यांच्या शरीराला खाज सुटते, यामुळे ते झाडाच्या खोडावर किंवा जमिनीवर मान खाजवायला प्रवृत्त होते. यामुळे त्वचेवर जखमा होतात आणि त्या उघड्या पडतात. तिथे माशांनी अंडी घातल्यानंतर मॅगॉटचा प्रादुर्भाव होतो आणि शेवटी जिवाणू संसर्ग आणि सेप्टिसीमिया ज्यामुळे मृत्यू होतो. मात्र मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने चित्ता संवर्धनासाठी कडक पावलं उचलली असून चित्त्यांसाठी पोषक वातावरण तयार करण्यावर भर दिला जात आहे.