CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

CM Shinde : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेने केलेल्या फसवणुकीविरोधात खातेधारकांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचं अश्वासन दिलं आहे.

मोठी बातमी! नगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू; महसूलमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं….

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मला भेटले होते त्यांनी आदर्श पतसंस्थेमध्ये भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं. मात्र आम्ही लोकांना या पथसंस्थेच्या संचालकांच्या सर्व प्रॉपर्टीज ताब्यात घेऊन, जप्त करून लोकांचे पैसे परत करू. असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांना दिलं आहे.

मराठवाड्यासाठी उघडली राज्याची तिजोरी; शिंदे सरकारकडून 59 हजार कोटींच्या पॅकजचे गिफ्ट

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी हा मोर्चा काढला काढण्यात आला. महिलानी बॅरिकेट्स तोडून मंत्रिमंडळ बैठक सभागृहाकडे कूच केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले असता पोलिसांनी आम्हाला लाठीने मारल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

त्यानंतर या आंदोलनामध्ये गोंधळ झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत बोलण्यासाठी गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील आले होते. त्यांनी यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान आदर्श पतसंस्थेमध्ये कोट्यावधी रूपायांचा घोटाळा झाला आहे. तर यामध्ये सत्ताधाऱ्यांचा आणि मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर मंत्री मोर्चेकऱ्यांना भेटत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube