नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा : PM मोदींची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग : नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची राजमुद्रा असणार आहे. शिवाय भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार आहे, अशा दोन मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्या. आज (4 डिसेंबर) नौदल दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर नौदलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Prime Minister Narendra Modi has announced that the royal seal of Chhatrapati Shivaji Maharaj will now be on the uniform of the Navy)
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशा घोषणा देत अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुरदृष्टीचा उल्लेख केला. समुद्रावर ज्याची सत्ता असेल तो जगावर राज्य करेल, असे शिवरायांनी सांगितले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. यावेळीच बोलताना त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या.
रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; खर्गेंकडून शिक्कामोर्तब, आजच शपथविधी
“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज भारत गुलामगिरीच्या मानसिकताला मागे सोडून पुढे जात आहे. आज नौदल दिनाच्या निमित्ताने मला आनंद घोषणा करताना आनंद होत आहे की आमच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीवर आता छत्रपती शिवाजी महाराजांची झलक बघायला मिळणार आहे. नौदलाच्या ध्वज मला गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे, असे मोदी म्हणाले.
‘राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच खोटा गुन्हा’; गुन्हा मागे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचा मोर्चा
शिवाय मला अजून एक घोषणा करताना आनंद होत आहे, असे म्हणत भारतीय नौसेना आता आपल्या पदांचे नामकरण भारतीय परंपरेच्या नजरेसमोर ठेवून करणार आहे, अशीही माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. आम्ही सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यावर भर देत आहोत. पण मी नौदलाचं अभिनंदन करतो. कराण नेव्हल शिपमध्ये पहिल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.