Adani Group : शिंदे सरकारकडून अदानी समुहाला मोठे कंत्राट, मुंबई, पुणे अन् बारामतीमध्ये होणार काम

Adani Group : शिंदे सरकारकडून अदानी समुहाला मोठे कंत्राट, मुंबई, पुणे अन् बारामतीमध्ये होणार काम

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला शिंदे सरकारकडून आणखी एका मोठे कंत्राट मिळाले आहे. महाराष्ट्रात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचे सुमारे 13,888 कोटींचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. (Gautam Adani’s Adani Group has bagged yet another major contract from the Shinde government)

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 13,888 कोटी रुपयांचे स्मार्ट मीटर बसवण्याचे सहा कंत्राट काढले आहेत. त्यापैकी दोन कंत्राट अदानी समुहाला मिळाले आहेत. दरम्यान, या व्यवहारांमुळे अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

अदानी समूहाला स्मार्ट मीटर बसवण्यासाठी मिळालेल्या दोन कंत्राटांनुसार, पहिले भांडुप, कल्याण, कोकण या भागातील आणि दुसरे बारामती, पुणे या भागासाठीचे कंत्राट आहेत. त्यापैकी भांडुप, कल्याण आणि कोकण या भागात 63.44 लाख मीटर आणि बारामती, पुणे या भागात 52.45 लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. बोलीमध्ये यशस्वी ठरलेल्या कंपन्यांना वाटप पत्रे देण्यात आली आहेत.

मुंबईतील 1000 कोटींच्या करारातही मारली आहे बाजी :

अदानी समुहाने 13, 888 कोटींच्या व्यवहाराशिवाय अलीकडेच मुंबईत बेस्ट उपक्रमांतर्गत वीज वितरण क्षेत्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळविले होते.

देशात अमृतकाल नाही विषकाल! बिधुरींना निलंबित करा; NCP पाठोपाठ Sanjay Raut मैदानात

इतर कोणत्या कंपन्यांना किती किंमतीची कंत्राट मिळाली?

अदानी समुहाशिवाय एनसीसी, माँटेकार्लो आणि जीनस यांना कंत्राट मिळाली आहेत. एनसीसीला नाशिक आणि जळगाव (3,461 कोटी किमतीचे 28.86 लाख मीटर) आणि लातूर, नांदेड आणि औरंगाबाद (3,330 कोटी रुपये किमतीचे 27.77 लाख मीटर) या दोन क्षेत्रांसाठी कंत्राटे जिंकली आहेत.

पवार-अदानींची भेट :

दरम्यान, हे कंत्राट मिळाल्याच्या 24 तासातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या गुजरातमधील घरी शरद पवारांनी भेट दिली होती. अंबानी कुटुंबात काहीतरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवारांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. पवार आणि अदानी यांचे मधूर संबंध पाहता या कंत्राटाचा आणि या भेटीचा काही संबंध होता का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube