देशात अमृतकाल नाही विषकाल! बिधुरींना निलंबित करा; NCP पाठोपाठ Sanjay Raut मैदानात

देशात अमृतकाल नाही विषकाल! बिधुरींना निलंबित करा; NCP पाठोपाठ Sanjay Raut  मैदानात

Sanjay Raut : भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत भर संसदेत अपशब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रमेश बिधुडी यांच्या विरोधात थेट हक्कभंगाची नोटीस धाडली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर सडकून टीका करत बिधुरींवर कारवाईची मागणी केली आहे.

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हा मुद्दा उचलत भाजपवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, नव्या संसदेतील पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांना एकता आणि एकात्मतेचा उल्लेख केला होता. त्याच सभागृहात त्यांच्याच पक्षाच्या खासदारने शिवीगाळ केली. अशा खासदाराला नुसती नोटीस पाठवून उपयोग नाही. कारण ती नौटंकी असते. अशा खासदाराला लोकसभेतूनच निलंबित केले पाहिजे आणि पक्षातूनही निलंबित केले पाहिजे. अशी भाषा ऐकल्यानंतर देशात अमृतकाल नाही तर विषकाल सुरू आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

Rohit Pawar : ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवारांनी सांगितलं राजकारणात का आलो ?

राजनाथ सिंहांचे राऊतांकडून कौतुक

या प्रकरणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली हे त्यांचं मोठेपण आहे. ते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या जुन्या बीजेपीला प्रेझेंट करतात. आजच्या बीजेपीला नाही. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्यात ते संस्कार आहेत. ज्या बीजेपीमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती दिसत होती ती आता दिसून येत नाही. अशा बाबतीत कुठल्याही बीजेपी लोकांवरती कारवाई झाली नाही तर यावर जनता कारवाई करेल, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

देशात अमृतकाल नाही तर विषकाल सुरू

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर राऊतांनी टीका केली. आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकरांनी ठोस काहीच केले नाही. देशात सर्रास कायदा, नियमांचे उल्लंघन होत आहे. आम्ही हे रोज उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. त्यामुळेच देशात सध्या अमृतकाल नाही तर विषकाल सुरू आहे, असे वाटत असल्याचे राऊत म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष स्वतःला बादशाह समजत असतील. मी जे करील तेच होईल असे जर ते म्हणत असतील तर त्यांची बादशाही एक दिवस नक्कीच संपेल असेही राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube