Rohit Pawar : ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवारांनी सांगितलं राजकारणात का आलो ?
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील दोन्ही गटातील वाद वाढला आहे. शरद पवार गटाचे नेते यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आ. पवार आज कल्याणमध्ये आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त केली. सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कितीही जन्म घेतले तरी रोहित पवार हे अजित पवार होऊ शकणार नाहीत असे तटकरे म्हणाले होते. त्यावर पवार म्हणाले, मला अजितदादांसारखं व्हायचं नाही. अजित पवार हे मोठे नेते आहेत. मी राजकारणात आलोय ते नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी.
शिंदेंच्या मतदारसंघात भाजपाची घुसखोरी? रोहित पवार म्हणाले, श्रीकांत शिंदेंसह सर्वच खासदार..
शून्य आमदार, खासदार असतानाही नव्या चेहऱ्यांना जनता निवडून देईल असा शरद पवारांना विश्वास आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांचा निकाल न्यायालयाच्या माध्यमातून केला जाईल असा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा संशयही त्यांनी येथे व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, पवार साहेबांना राज्यातील नागरिक महत्वाचे आहेत. कार्यकर्ते महत्वाचे आहेत. पदाधिकारीही महत्वाचे आहेत. आगामी निवडणुकीत लोक नव्या चेहऱ्यांना संधी देतील असा त्यांना विश्वास आहे.
राष्ट्रवादी फोडली पण, आता काय होतंय ते पाहाच
भाजपवर टीका करताना पवार म्हणाले, 2019 मध्ये भाजपने कोणत्याच घटक पक्षाला विचारात घेतलं नव्हतं. आता मात्र 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडून घटक पक्षांच्या बैठका घेतल्या जात आहेत. याचं कारण म्हणजे आता भाजपवाले विरोधकांच्या इंडिया आघाडीला घाबरलेत. इंडियाकडे 250 खासदार आहेत. भाजपकडे 1664 आमदार आहेत. तर इंडियाकडे 1700 च्या आसपास आमदार आहेत.
राज्याचा विचार केला तर एका सर्व्हेनुसार महाविकास आघाडीच्या 28 जागा निवडून येतील. महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येण्याच्या उद्देशने भाजपने शिवसेना फोडली. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी फोडली. शिंदेंना सत्तेत घेतल्यानंतर सुद्धा सर्व्हेनुसार आकडा बसत नव्हते त्यामुळे राष्ट्रवादी फोडली पण आता काय होतंय ते पाहाच असा इशारा रोहित पवारांनी भाजपला दिला.
Supriya Sule : भाजप खासदाराविरुद्ध सुळेंनी दिली हक्कभंगाची नोटीस, नेमका वाद काय ?