Train Derail : साबरमती-आग्रा सुपरफास्टची मालगाडीला धडक, 4 डब्बे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू

Train Derail : साबरमती-आग्रा सुपरफास्टची मालगाडीला धडक, 4 डब्बे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू

Sabarmati-Agra Train Derail: राजस्थानच्या अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रे (Sabarmati Express) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातानंतर साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ही घटना घडली. दोन्ही गाड्या एकाच रेल्वे रुळावरून आल्यानं ही घटना घडली. रेल्वेचे चार डब्बे घसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सध्या रुळावरून घसरलेल्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा! पुढील 48 तासात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस 

अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकावर रात्री 1.04 वाजता साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, साबरमती आग्रा केंट सुपरफास्ट एक्सप्रेसचे चार डब्बे रुळावरून खाली घरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोको पायलटने ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला, पण पायलट ही टक्कर टाळू शकला नाही.

अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना धक्का बसला आणि सीटवर झोपलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडले. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली.

लोकांची कामे करण्यात ‘त्यांना’ स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच मजा….; विखेंची थोरातांवर टीका 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीला धडकल्याने इंजिनसह जनरल डब्यातील चार बोगी रुळावरून घसरल्या. या अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, काही प्रवाशांना दुखापत झाल्याचे येत आहे. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आले आहे. सध्या रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतरचा व्हिडीओही समोर आला

रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

उत्तर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी ०१४५-२४२९६४२ या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन रेल्वेनं केलं. रेल्वेने पुढे सांगितले की, ‘यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तात्काळ कारवाई करत रेल्वेचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले असून अपघात निवांत गाडी मदार येथे पोहोचली असून ट्रॅक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube