विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा! पुढील 48 तासात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा! पुढील 48 तासात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

Rain Forecast : सध्या बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं. काल विदर्भ मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर पुन्हा एकदा येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

लोकांची कामे करण्यात ‘त्यांना’ स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच मजा….; विखेंची थोरातांवर टीका 

आजपासून 21 तारखेपर्यंत विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 18 ते 20 तारखेदरम्यान मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी आणि 19 तारखेला मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. प्रामुख्याने विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Russian presidential election : रशियात पुन्हा पुतिनच सत्तेवर, 88 टक्के मतांनी दणदणीत विजय 

आज गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

उपराजधानीत दोन दिवसांपासून पाऊस
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत आणि मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडूपासून कोमोरीनपर्यंत सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. उपराजधानीत गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक झाडे कोसळून पडली असून वाऱ्याच्या वेगामुळे काही घरांची पत्रेही उडून गेली आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांसाठी 17 ते 19 मार्च दरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube