आगीची अफवा पळापळ अन् जीव वाचण्यासाठी उड्या; पुष्पकच्या अपघाताने मुंबईतील ‘तो’ अपघात चर्चेत
Fire Rumor In Mumbai Local Train 49 Women Died : तब्बल 32 वर्षांपूर्वी मुंबईची (Mumbai Local) लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये आग लागल्याच्या भितीनं मोठा गोंधळ उडाला. लेडिज स्पेशल लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली होती. तेव्हा घाबरलेल्या महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या घेतल्या. तेव्हाच विरूद्ध दिशेने दुसरी लोकल येत होती…उड्या घेतलेल्या महिला थेट दुसऱ्या लोकलखाली (Train) आल्या. यामध्ये 49 महिलांचा लोकलखाली चिरडून मृत्यू झाला होती. पश्चिम रेल्वे मार्गावर हे मृत्यू तांडव पाहायला मिळालं होतं. कालच्या घटनेनं याच कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्यात.
त्याचं झालं काय?….तर…चर्चगेटवरून लेडीज स्पेशल सुटली अन् कांदिवली स्टेशनमधून पुढे गेली. एका महिलेनं लोकलच्या डब्यातून धूर येत असल्याचं पाहिलं. ती मोठ्यानं…आग..आग..असं किंचाळली. अचानक एका डब्याला आग लागल्याची चर्चा (Fire Rumor) सुरू झाली. लोकमधील महिलांत रेल्वेला आग लागल्याच्या भीतीनं मोठा गोंधळ उडाला. त्यांना काय करावं ते महिलांना समजेना. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. भीतीपोटी महिलांची पळापळ झाली…त्यामुळं चेंगराचेंगरी देखील झाली.
पुण्यात क्रूरतेलाही लाजवणारी घटना; पत्नीची हत्या करून बनवला व्हिडिओ अन् पोलिसांकडे गेला
महिलांनी लोकलची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला..पण तो निष्फळ ठरला…लोकल न थांबल्यामुळं जीव वाचवण्यासाठी महिलांनी बाजूच्या ट्रॅकवर उड्या घेतल्या…पण त्या दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या लोकलने त्यांना चिरडलं. सगळीकडे रक्तच रक्त..घटना घडली त्यावेळी संध्याकाळचे साडे सात वाजले होते. मुसळधार पावसानं विजपुरवठा खंडित झाला होता..त्यामुळं बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.
मोठी बातमी! कपिल शर्मासह ‘या’ सेलिब्रिटींना पाकिस्तानातून धमकीचा मेल, ‘जर 8 तासांत…’
खरं तर त्यावेळी कांदिवलीमध्ये त्या दिवशी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता…त्यामुळं वीज देखील खंडित झाली होती. अगदी तेव्हाच या महिलेला डब्यात धूर झाल्यासारखं वाटलं. पण, प्रत्यक्षात लोकलमध्ये आग लागलीच नव्हती. पण धुर बघून घाबरलेली महिला…आग..आग असं ओरडली अन् मोठा अनर्थ घडला. घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट होत होता… यातला विजेचा लोख रेल्वेच्या ओव्हरहेड वायरजवळ चमकला असावा, तेव्हाच महिलांना रेल्वेत आग लागल्याचा भास झाला…अन् त्यांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर उड्या घेतल्या असाव्या. अशीच घटना 1966 मध्ये मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर घडली होती. त्या घटनेत सुद्धा पाचजणांचा मृत्यू झाला होता.
कांदिवली स्थानकाजवळ ट्रॅक पूर्ण रक्तानं माखला होता. चर्चगेटकडं जाणाऱ्या फास्ट लोकलनं या महिलांना चिरडलं होतं. रेल्वे ट्रॅकवर एकीकडे अवयवांचे तुकडे पडले होते, तर दुसरीकडे रक्ताचे पाट वाहत होते. यामधील महिलांचे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत होते. या महिलांची ओळख पटवणं सुद्धा कठीण झालं होतं. पावसामुळं रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं..त्याचंच हे रक्त मिसळलं होतं…तिथलं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं…याच घटनेची पुनरावृत्ती आता जळगावमध्ये झाल्याचं पाहायला मिळालीय.