झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! मालगाड्यांची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू..

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! मालगाड्यांची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू..

Jharkhand Train Accident : झारखंडमधील बरहेट येथे दोन मालगाड्यांची जोरदा धडक (Jharkhand Train Accident) होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. फरक्का येथून ललमटियाकडे रेल्वे मालगाडी निघाली होती. त्यावेळी बरहेट येथे आधीपासूनच उभ्या असलेल्या दुसऱ्या एका मालगाडीला या मालगाडीची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनचा चेंदामेंदा झाला. यातच आग लागली त्यामुळे येथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली. या दोन्ही मालगाड्या कोळशाची वाहतूक करत होत्या.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर आग आटोक्यात आणता आली. या अपघातात दोन्ही लोको पाटलट्सचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. जखमींमध्ये रेल्वे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात कशामुळे झाला यामागे काय कारण होते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, ट्रकला धडकली कार; अभिनेत्याने सांगितलं काय घडलं?

मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर मालगाडी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. सध्या रेल्वे लाइनवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. दोन्ही मालगाड्या एकाच रुळावर कशा आल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपघातानंतर येथे धावपळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाबरोबर मदतकार्य सुरू केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube