Jharkhand News : अबब! 15 हजार सॅलरी असणाऱ्या नोकराकडे कोट्यवधींचं घबाड; पाहा व्हिडिओ

Jharkhand News : अबब! 15 हजार सॅलरी असणाऱ्या नोकराकडे कोट्यवधींचं घबाड; पाहा व्हिडिओ

Jharkhand ED Raids: देशात सध्या लोकसभा निवडणुकीच (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू असतांनाच ईडीने सोमवारी रांचीमधील 9 ठिकाणी छापे टाकले. ईडीने भल्यापहाटे झारखंड सरकारचे मंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) आणि ग्रामविखास खात्याचे अभियंते यांच्या घरावर छापेमारी केली. यावेळी ईडीच्या हाती कोट्यावधीचं घबाड लागलं आहे. आतापर्यंत ईडीने 25 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाचा हिशोब न देणं भोवणार 

झारखंडमधील ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची ईडी चौकशी करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईडीने आज छापेमारी केली. मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड 20 ते 30 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छाप्यात जप्त करण्यात आलेली रोकड इतकी मोठी आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आता नोट मोजण्याचे यंत्र मागवले आहे.

सध्या ईडीचे अधिकारी नोकरीची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, हे पैसे आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचे असल्याचे नोकराने सांगितले आहे. निवडणुकी दरम्यान एवढी मोठी रक्कम जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

Jharkhand ED Raids: अबब! मंत्र्याच्या पीएचा नोकरही कोट्याधी, ईडीच्या धाडीत सापडलं मोठं घबाड.. 

धुर्वा येथील सेल सिटी परिसर आणि मोराबादीतील बोडेया रोड येथेही छापेमारी सुरू आहे. ज्यांच्या घरांवर ईडी आज छापे टाकत आहे ते सर्व माजी मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी ईडीच्या पथकाने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित एकूण 24 ठिकाणांवर छापे टाकले होते. तेव्हा वीरेंद्र राम यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त 100 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली होती. छाप्यात दीड कोटींचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकडही सापडली होती. त्यानंतर त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर आज ईडीने ही छापेमारी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube