सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाचा हिशोब न देणं भोवणार

सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाचा हिशोब न देणं भोवणार

Election Commission Notice Sunil Tatkare : देशात सर्वत्रत निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरू आहे. मतदारांनी आपल्यालाच निवडून द्यावं, यासाठी उमदेवार मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात. केलेल्या खर्चाचा हिशोब जिल्हास्तरावरील यंत्रणेला द्यावला लागतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांना नोटीस बजावली आहे.

उद्धव ठाकरेंना धक्का, विजय करंजकरांचा मध्यरात्री अडीच वाजता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश 

लोकसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाची उमेदवारांच्या खर्चावर विशेष नजर असते. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून नेमका किती पैसा खर्च केला जातोय, यावर निर्णय अधिकारी लक्ष ठेवून असतात. उमेदवारांना विविध बाबींवर खर्चकरण्याच्या रकमेची मर्यादा घालून दिलेली असते.

निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोबा तपासला. तेव्हा अनंत गीते यांनी 30 लाख 64 हजार 934 रुपयांच्या खर्चाचा हिसोब दिला. कुमुदिनी चव्हाण यांनी 8 लाख 55 हजार 625 रुये, तर प्रकाश चव्हाण यांनी 46 हजार 379 रुपये केला. मात्र, तटकरेंनी खर्चाचा हिशोब न दिल्यानं त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने तटकरेंसह चार उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.

अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, BJP वर आरोप 

सुनील तटकरे, बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण, पांडुरंग चौले आणि अजय उपाध्याय यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कुमुदिनी चव्हाण आणि पांडुरंग चौले यांना प्रलंबित प्रकरणांची माहिती कमी खप असलेल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती.

अपक्ष उमेदवार अजय उपाध्याय यांचा निवडणूक खर्च 10,000 रुपयांपेक्षा कमी असल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली. निवडणूक खर्चाच्या नोंदी अपूर्ण असल्याने तटकरे यांना नोटीस बजावण्यात आली होती. तटकरे यांनी केलेल्या खर्चाची आज (6 मे) रोजी चौकशी होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज