अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, BJP वर आरोप

अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, BJP वर आरोप

Amethi Congress Office: रविवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर (Congress Office ) गोंधळ घातला. त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करून गोंधळ घातला. त्यानंतर कॉंग्रेसने भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत.

डिजिटल जाहिरातींमध्ये भाजप अव्वल! गुगल-युट्यूबला दिल्या 100 कोटींच्या जाहिराती 

रस्त्याच्या मधोमध घडलेल्या या घटनेनंतर कॉंग्रेस कार्यालयाबाहे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ही माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कॉंग्रेसने पोलिसांवरही गंभीर आरोप केले.

प्रकरण तापत असल्याचे पाहून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेस कार्यालयात परत पाठवले. यावेळी क्षेत्र अधिकारी मयंक द्विवेदी यांनीही कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक हरेंद्र प्रतापही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, काँग्रेस कार्यालयाबाहेर काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हल्ल्याबाबत काँग्रेस पक्षाने एक निवेदन जारी केले आहे. कॉंग्रसने आपल्या निवेदनाच म्हटलं की, स्मृती इराणी आणि भाजप कार्यकर्ते यूपीच्या अमेठीमध्ये चांगलेच घाबरले आहेत. समोर पराभव दिसत असल्याने हताश झालेले भाजपचे गुंड लाठ्या घेऊन अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांवरही प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

आरोप करताना कॉंग्रेसने म्हटलं की, ‘घटनेदरम्यान स्थानिक लोकांच्या वाहनांचेही नुकसान करण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान पोलीस प्रशासन मूक प्रेक्षक म्हणून उभे होते. अमेठीमध्ये भाजपचा पराभव होणार आहे याची ही घटना साक्षीदार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube