झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या वडिलांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former Jharkhand Chief Minister Shibu Soren passes away; breathed his last at the age of 81 : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते सध्या मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांचे वडिल होते. . ते किडनीच्या आजाराने गेल्या महिन्याभरापासून रूग्णालयात दाखल झालेले होते. त्यांच्या निधनानंतर झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.
Former Jharkhand Chief Minister Shibu Soren passes away, confirms his son and Jharkhand CM Hemant Soren. pic.twitter.com/k7FicMLUed
— ANI (@ANI) August 4, 2025
यवत प्रकरण म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचा जगतापांसह पडळकरांवर हल्लाबोल
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून वडिल शिबू सोरेन हे दिल्लीतील रूग्णालयात दाखल असल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील रूग्णालयातच होते. मात्र त्यांनी रूग्णालयाच अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यानंतर सोशल मिडीयावर आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहिलं की, आदरणीय दिशोम गुरूजी आपल्याला सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो आहे.
मराठा लग्न आचारसंहिता! काय आहेत नवीन नियम? जाणून घ्या सविस्तर..
दरम्यान शिबू सोरेन यांना झारखंड निर्मितीचे मुख्य नेते होते. त्यांना झारखंडमध्ये गुरूजी या नावाने ओळखलं जात होतं. झारखंड मुक्ती मोर्चासह त्यांनी आदिवासींच्या अधिकारांसाठी देखील मोठा लढा दिला. तसेच त्यांच्या झारखंड वेगळं करण्याच्या मोहिमेला यश आल्यानंतर ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले होते.
हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री…
दरम्यान नोव्हेंबर 2024 मध्ये झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री झाले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 81 पैकी 56 जागा जिंकल्या होत्या. सोरेन यांनी भाजपच्या गमालीएल हेम्ब्रोम यांचा 39,791 मतांनी पराभव करून बारहेत जागा राखली. सोरेन यांना 95,612 मते मिळाली, तर हेमब्रोम यांना 55,821 मते मिळाली.