दुबईत कशामुळे झाला इतका पाऊस? कृत्रिम पाऊस की दुसरे काही
Dubai Rain : सध्या उन्हाळ्याच्या झळा अंगाला चटके दिल्यासारखे पोळत आहेत. जगभरात उष्णतेने उच्चांक गाठलाय. जगातील सुप्रसिद्ध दुबई शहरात पावसाने हाहाकार माजवलाय. (Dubai) यूएई आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात 16 एप्रिल रोजी मोठी अतिवृष्ठी झाली. (Rain ) त्यामुळे या शहरात जिकडे पाहावे तिकडं पाणीचं पाणी साचलं होत. (Dubai Rain ) तसंच, पावासाचा जोर इतका होता की शहरातील अनेक ठिकाणची वाहण चक्क पावसाने साचलेल्या पाण्यात तरंगत होते. दरम्यान, क्लाउड सीडिंग या पावसाला कारणीभूत आहे असा प्राथमिक अंदाज समोर आलाय.
क्लाउड सीडिंगमध्ये गडबड
शहरात मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्याने त्याचा धोका लक्षात घेऊन एअरपोर्ट बंद करण्यात आली आहेत. यामध्ये, गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मंट्रोलॉजीच्या मते, 15 व 16 एप्रिलला अलएन एयरपोर्टवरून क्लाउड सीडिंगसाठी (कृत्रिम पाऊस) विमानांनी उड्डाण केलं होतं. या दोन दिवसांत सात विमानांनी उड्डाण केल. त्यादरम्यान, क्लाउड सीडिंगमध्ये झालेल्या गडबडीमुळे दुबईत इतका पाऊस झाल्याचं म्हटलं जातंय.
धूळ यासाठी कारणीभूत ठरली
दुबईत झालेल्या पावासाबद्दल हवामानशास्त्रज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. दुबई आणि आसपासच्या देशांमध्ये सदर्न जेट स्ट्रीम संथ गतीने सुरू आहे. ही वातावरणातील हवा सोबत उष्णता घेऊन येते. तसंच, दुबई आणि आसपास समुद्र असल्याने धुळीची वादळं येतात. त्याचबरोबर धूळही क्लाउड सीडरचे काम करते. विज्ञानात त्याला कंडेन्सेशन न्यूक्लीआय म्हणतात. त्यामुळे धुळीच्या वादळामुळे क्लाउड सीडिंगमध्ये गडबड झाली आणि हा पाऊस आला असं तज्ज्ञांनी सांगितलं.
लोक पावसाला जास्त का घाबरतात?
दुबई हा प्रामुख्याने एकदम वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळे अतिवृष्टी जर झाली तर भूस्खलनाचा धोका वाढतो. तसंच, अचानक मोठा पाऊस येऊन निर्माण झालेल्या पुरामुळे मोठं नुकसान होण्याचा धोका असतो. महत्चाचं म्हणजे, दुबईमध्ये पाऊस कमी पडतो. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी फारशी व्यवस्था येथे नाही. अशा परिस्थितीमध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त जास्त पाऊस झाला की इथलं जनजीवन विस्कळीत होतं. दरम्यान, आर्टिफिशियल पावसासाठी वैज्ञानिक विमानाच्या माध्यमातून ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइड, ड्राय आईस आणि मीठ सोडतात, याला क्लाउड सीडिंग म्हणतात.
निसर्गाशी छेडछाड करण्याचे परिणाम
दुबईची सरकारी न्यूज एजन्सी डब्ल्यूएएमच्या मते, 1949 मध्ये गोळा केलेल्या डेटानुसार आजपर्यंत मंगळवारी दुबईमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यांनी यामध्ये सविस्तर माहिती सांगताना निसर्गाशी छेडछाड केले असल्याने हे परिणाम झाले असल्याचं तज्ञांचं मत आहे. दुबईने 2002 मध्ये क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. जेव्हा ढगांमध्ये अतिरिक्त पावसाची अपेक्षा सर्वात जास्त असते तेव्हा त्याचा वापर केला जातो. क्लाउड सीडिंसाठी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.