चित्रपटसृष्टीत शोककळा; चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकारणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन

Actor Achyut Potdar Passes Away : कला क्षेत्रातून दुःखद बातमी येत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका करणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचं वयाच्या 91 व्या वर्षी दु:ख निधन झालं. (Potdar) काल सोमवारं रात्री मुंबईतील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल काही माहित ही मिळू शकली नाही.
अच्युत पोतदार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आमिर खानच्या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही दिवसांपासून अच्युत पोतदार हे आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते आणि रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्युपिटर हॉस्पिटल उपचार सुरू असतानाच त्यांचा जीव गेला. त्यांच्यावर अंतिम संस्कार 19 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यात केले जातील. हेच नाही तर अभिनय क्षेत्रात येण्याच्या अगोदर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये काम केले.
मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धक केसेनिया अलेक्झांड्रोवाचे निधन
80 च्या दशकात त्यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आणि अभिनय क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव ते बनले. अच्युत पोतदार हे आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसले आहेत. फक्त आमिर खानच नाही तर त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.चित्रपटांव्यतिरिक्त अच्युत पोतदार यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’ या यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले.
या चित्रपटांमध्ये केलं काम
आक्रोश,
अर्ध सत्य,
तेजाब,
परिंदा,
दिलवाले,
ये दिलगी,
रंगीला,
व्हाय अल्बर्ट पिंटो को गुस्सा आता है
राजू बन गया जेंटलमन