Box Office: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ने केली 600 कोटींपेक्षा अधिकची कमाई, रचला इतिहास…

Box Office: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ने केली 600 कोटींपेक्षा अधिकची कमाई, रचला इतिहास…

Kalki 2898 AD Box Office Collection: प्रभासचा (Prabhas) चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Box Office ) घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून बॉक्स ऑफिसवर त्याचे यश अजूनही कायम आहे. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘कल्की 2898 एडी’ ने जगभरात उत्कृष्ट कलेक्शन केले आहे. प्रभासच्या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांत बजेट पूर्ण केले आहे. हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


कल्कीच्या हिंदी आवृत्तीनेही उत्तम कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पूर्वी चित्रपटाची तेलगू आवृत्ती अधिक कमाई करत होती आणि हिंदी आवृत्ती कमी कमाई करत होती. परंतु आता हिंदी आवृत्ती गाजत आहे.

भारतात 600 कोटींची कमाई

‘कल्की 2898 एडीने’ भारतात 600 कोटी रुपये जमा केले आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 468 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातील एकूण कलेक्शनसह 616 कोटींची कमाई केली आहे. दोन आठवड्यांत इतका गल्ला महत्त्वाचा आहे. तरीही त्याची हिंदी आवृत्ती वीकेंडला चांगली कमाई करेल.

जगभर खूप कमाई केली

कल्की 2898 एडी च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने 221 कोटी रुपयांचे परदेशात कलेक्शन केले आहे आणि एकूण जगभरातील कलेक्शन 837 कोटी झाले आहे. हा आकडा लवकरच 1000 कोटींचा टप्पा पार करेल.

Kalki 2898 AD: कधी अन् किती वाजता ओटीटीवर स्ट्रीम होणार ‘कल्की 2898 एडी’? उत्सुकता शिगेला

‘इंडियन 2’ चा प्रभाव पडेल

‘कल्की 2898 एडी’ च्या कमाईवर आज रिलीज झालेल्या ‘इंडियन 2’ मुळे परिणाम होऊ शकतो. चाहते कमल हसनच्या या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते आणि आता प्रतीक्षा संपली आहे. ‘इंडियन 2’ चे रिव्ह्यू चांगले आहेत, त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे. ‘कल्की 2898 एडी’ बद्दल बोलायचे तर हा चित्रपट नाग अश्विनने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube