मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धक केसेनिया अलेक्झांड्रोवाचे निधन

मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धक केसेनिया अलेक्झांड्रोवाचे निधन

Kseniya Alexandrova Death : रशियाची प्रसिद्ध मॉडे आणि मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धक केसेनिया सर्गेव्हना अलेक्झांड्रोवाचे (Kseniya Alexandrova Death) निधन झाले आहे. माहितीनुसार, रस्ते अपघातात केसेनियाचा निधन झाले. 30 वर्षीय केसेनियाचा 5 जुलै 2025 रोजी अपघात झाला आणि ती एका महिन्याहून अधिक काळ जीवन आणि मृत्यूशी झुंजत होती. 12 ऑगस्ट 2025 रोजी तिने मॉस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोण होती केसेनिया अलेक्झांड्रोवा ?
केसेनियाचा जन्म 12 नोव्हेंबर 1994 रोजी मॉस्को येथे झाला. ती एक प्रसिद्ध रशियन मॉडेल होती आणि 2017 मध्ये मिस रशिया स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली. तिने रशियाचे प्रतिनिधित्व करताना मिस युनिव्हर्स 2017 मध्ये भाग घेतला. कासनिया टॉप-16 मध्ये स्थान मिळवू शकली नाही परंतु तिने तिच्या सौंदर्य आणि आत्मविश्वासाने बरीच मथळे बनवली.

कास्नियाने प्लेखानोव्ह इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून फायनान्सचे शिक्षण घेतले आणि नंतर मानसशास्त्रात पदवी देखील मिळवली. कास्निया मॉडेल असण्यासोबतच मानसशास्त्रज्ञही होती. सोशल मीडियावर तिला 79 हजार फॉलोअर्स फॉलो करत होते. कास्नियाने मार्च 2025 मध्ये लग्न केले होते.

अपघात कसा झाला?
वृत्तानुसार, रशियाच्या ट्वेर ओब्लास्ट भागातील एम-9 महामार्गावर हा अपघात झाला. कास्निया आणि तिचा पती रझेव्हहून मॉस्कोला परतत होते. तेव्हा अचानक त्यांच्या कारसमोर एक मोठे जंगली हरण (एल्क) आले. टक्कर इतकी भीषण होती की एल्क कारची विंडशील्ड तोडून आत घुसला आणि कास्नियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस धो धो पाऊस 

अपघाताच्या वेळी कास्निया कारच्या प्रवासी सीटवर बसली होती आणि तिचा पती गाडी चालवत होता. दोघांनीही सीटबेल्ट घातले होते, परंतु कारच्या डिझाइनमुळे, धडकेत एअरबॅग्ज व्यवस्थित काम करत नव्हत्या. त्यामुळे दुखापत आणखी गंभीर झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या