पुढील 4 दिवस महत्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा कहर, 10+ जिल्हे हाय अ‍लर्टवर

पुढील 4 दिवस महत्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा कहर, 10+ जिल्हे हाय अ‍लर्टवर

Maharashtra Weather Update Heavy Rains : राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत (Maharashtra Weather Update) आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने (Heavy Rains) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, उपनगर आणि तळ कोकणात पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना (Maharashtra Rain) सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी आणि कोकणात रात्रभर पाऊस

गेल्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये मुसळधार सरी कोसळत असताना, काही ठिकाणी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागाने आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कल्याण हादरलं! रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीयाची बेदम मारहाण, CCTV फुटेज धक्कादायक

पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट

पालघर जिल्ह्यात आजसुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे सकाळपासून ढगाळ हवामान असून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज राहण्याचे निर्देश देत आहे.

विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट 

आज दिनांक 23 जुलैला हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 24 जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू, प्यू रिसर्चच्या अहवालात धक्कादायक खुलासा…

जिल्हानिहाय अलर्टचे अपडेट्स

23 जुलै:
ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे घाटमाथा
येलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

24 जुलै:
ऑरेंज अलर्ट – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट – मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथा, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा

25 जुलै:
ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट – मुंबई, ठाणे, संपूर्ण विदर्भ, हिंगोली, नांदेड

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube