Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Update : राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील पंधरा दिवसात (Weather Update) राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र या आठवड्यात पावसाने पुन्हा (Rain Alert) दमदार हजेरी लावली आहे. आजही पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तर घराबाहेर पडा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube