Rohit Arya : पवईतील RA स्टुडिओची स्क्रिप्ट रोहितने 4 ऑक्टोबरलाच अभिनेत्रीला फोनवर सांगितलेली

Rohit Arya Kidnapping Story मुलांना ओलीस ठेवण्याचं प्लॅनिंग खूप आधीपासून? मराठी अभिनेत्रीने रोहित आर्यबद्दल दिली धक्कादायक माहिती

  • Written By: Published:
Rohit Arya : पवईतील RA स्टुडिओची स्क्रिप्ट रोहितने 4 ऑक्टोबरलाच अभिनेत्रीला फोनवर सांगितलेली

Pawai RA Studio Kidnaping Case Rohit Arya Disclose His Stoty With Actress Ruchita Jadhav : पवईतील RA स्टुडिओतील अपहरण नाट्यातील मुख्य आरोपी रोहित आर्यचा काल (दि.30) एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर आता या रोहित आर्यबाबत (Rohit Arya) नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, पवईत RA स्टुडिओमध्ये घडणार असलेल्या अपहरण नाट्याची स्क्रिप्ट रोहितने  4 ऑक्टोबरला आघाडीची अभिनेत्री रूचिता जाधवला (Ruchita Jadhav) फोनवर सांगितली होती. स्वतः रूचिताने याबाबत तिच्या पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. रूचिताच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मला पाच लिटर पेट्रोल आणायला सांगितलं आणि….अभिनेता रोहित आर्याबद्दल साक्षीदाराचे धक्कादायक खुलासे

रूचिता जाधवनं नेमकं काय सांगितलं?

रूचिताने केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, मी 2010-11 मध्ये ‘अरे बाबा पुरे’ तरच्या डबिंगला रोहितच्या स्टुडिओमध्ये गेले होते. त्यावेळी आम्ही एकमेकांना नंबर्स शेअर केले होते. मात्र, त्यानंतर रोहित आणि माझा काहीच संपर्क झाला नाही. पण, अचानक 4 ऑक्टोबरला मला रोहित आर्यचा एका सिनेमासंदर्भात तुझ्याशी बोलायचे आहे असा मेसेज आला. तसेच जेव्हा फ्री असशील तेव्हा फोन कर. साधारण 2 वाजून 52 मिनिटांनी रोहितने हा मेसेज मला केला होता असे रूचिता सांगते.

Ruchita Jadhav Post

संध्याकाळी 6 वाजता मी त्याला विचारलं आता बोलू शकतो का? त्यानंतर त्याने 7:15 ला मला मेसेज केला तेव्हा माझे आणि त्याचे बोलणे झाले. त्यावेळी आम्ही साधारण 9 मिनिटे फोनवरून बोललो. फोन कॉलदरम्यान त्याने मला चित्रपटाची कथा काय असेल हे सांगतना एक चांगला माणूस असतो. दहशतवादी नसतो. तो विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो. त्याच्या काही मागण्या असतात. सरकारपर्यंत त्याला या मागण्या पोहोचवायच्या असतात. तो अतिशय चांगला मनुष्य असतो, अशी चित्रपटाची कथा त्याने मला सांगितली होती, असे रूचिताने सांगितलं

Ruchita Jadhav Post

एनजीओचा संचालक ते सरकारी कंत्राटदार… रोहित आर्य कोण होता ?

चित्रपटात रूचिताची भूमिका काय होती?

चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर रूचिताने रोहितला तो करणार असलेल्या चित्रपटात भूमिका काय असेल असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी रोहितने  तू विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षिकेचा किंवा विद्यार्थ्याच्या पालकाची भूमिका कर असे उत्तर दिले होते. किडनॅपरचा मेसेज पोहोचवण्याचे काम तुझ्यावर तुझ्या पात्राचे असेल असेही रोहितने रूचिताला फोनवर सांगितल्याचे तिने सांगितले. त्यावर मी विचार करते आणि कळवते, असे रोहित आर्याला सांगितले.

दिवाळीच्या काळात त्याने मला हॅपी दीपावलीचा मेसेज केला होता. मी त्याला काही रिप्लाय केला नव्हता. त्याने नंतर मला 27, 28, किंवा 29 ऑक्टोबर रोजी भेटायचे का? असे विचारले होते. मी त्याला 28 तारखेला भेटूयात असे सांगितले. त्यावेळी त्याने मला आरए स्टुडिओचे (RA Studio) गुगल लोकेशन पाठवले होते, अशी माहिती ऋचिता जाधवने दिली. पण माझ्या घरी इमर्जन्सी असल्याने मी जाऊ शकले नाही. परंतु, कालच्या घटनेबद्दल ऐकल्यानंतर या घटनेच्या किती जवळ असणार होते हा विचार करून मला स्वस्थ बसवत नसल्याचे रूचिता म्हणाली.

follow us