डॉ. विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्ष, मविआची बाजी लंकेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

Dr. Vidya Kaware अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे.

Dr. Vidya Kaware

Dr. Vidya Kaware elected Mayor of Parner, MVA’s victory seals Lanke’s leadership : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस’चा एकला चलो नारा, वडेट्टीवांरांची मोठी घोषणा

नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांनी सहज विजय मिळवला.महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. कावरे यांनी मतदान करून डॉ. कावरे यांचा विजय निश्चित केला.

खड्डयामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संपूर्ण सहकार्य करणार

विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशीव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले. लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत “डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे” असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषकडून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ च्या गाण्याचं कौतुक! म्हणाला इलैयाराजा सर…

नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.खासदार नीलेश लंके यांनी नगरसेवकांच्या निष्ठेचे कौतुक करत म्हटले की, राजकारणात निष्ठा सर्वांत मोठी असते. लाखो रुपयांचे आमिष असतानाही आघाडीचे नगरसेवक डगमगले नाहीत, हीच खरी आमची ताकद आहे. डॉ. विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे.

 

 

 

 

 

follow us