दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषकडून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ च्या गाण्याचं कौतुक! म्हणाला इलैयाराजा सर…

Southern superstar Dhanush मराठी चित्रपट गोंधळचं प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. याबाबत त्याने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

Southern Superstar Dhanush

Southern superstar Dhanush praises the song from the Marathi film ‘Gondhal’ : आपल्या मराठी संस्कृतीचा आणि श्रद्धांचा अविभाज्य भाग असलेला ‘गोंधळ’. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा होणारा एक पारंपरिक विधी आणि हाच पारंपरिक गोंधळ आता रुपेरी पडद्यावर अवतरतोय! या चित्रपटावर विशेषत:या चित्रपटाच्या संगीतकारांचं दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषकडून प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. याबाबत त्याने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे.

धनुषकडून ‘गोंधळ’ च्या गाण्याचं कौतुक!

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांनी इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेल्या आणि अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांच्या आवाजात साकारलेल्या संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ चित्रपटातील गीताचं कौतुक केलं.तो म्हणाला की, मराठी चित्रपट गोंधळमधील चंदन हे इलैयाराजा सरांचं गाणं एक रत्न आहे. तुम्ही आम्हाला आश्चर्च चकीत करण्याचं थांबवत नाही आहात. असं म्हणत धनुषने ‘गोंधळ’ चित्रपटातील गीताचं कौतुक केलं.

https://x.com/dhanushkraja/status/1987139373507486029?s=48&t=D9AQkNAheJXJGSySbIFi3A

‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना एक भव्य, रहस्यमय आणि सांस्कृतिक प्रवास घडवेल, यात शंका नाही.

follow us