योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये घमासान! “इस बार मामला फिल्मी है”

योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये घमासान! “इस बार मामला फिल्मी है”

Gorakhpur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत सहा टप्प्यांतील मतदान झालं आहे. आता 1 जून रोजी सातव्या (Gorakhpur Lok Sabha Election) आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आज सायंकाळी प्रचाराच्या तोफाही थंडावतील. शेवटच्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे त्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघही आहे. गोरखपूर म्हणजे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा (Yogi Adityanath) बालेकिल्ला. याच मतदारसंघातून आदित्यनाथ संसदेत पोहोचले. गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे ते महंत आहेत.

येथील निवडणुकांच्या निकालांवर गोरखनाथ मंदिराचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या मंदिराचा प्रभाव फक्त गोरखपूर नाही तर आजूबाजूच्या आठ जागांवरही आहे. सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे. येथे सातत्याने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येत आहे.

आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक झाली. भाजपने उपेंद्र शुक्ल यांना तिकीट दिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मधील निवडणुकीत भाजपने अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली. रवी किशन मात्र विजयी झाले. आताही भाजपने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. समाजवादी पार्टीने रवी किशन यांच्या विरोधात अभिनेत्री काजल निषाद यांना तिकीट दिले आहे. काजल निषाद या भोजपुरी अभिनय क्षेत्रातील मोठं नाव आहे. अशा पद्धतीने आता गोरखपूरच्या मैदानात दोन्ही उमेदवार अभिनय क्षेत्रातील आहेत.

Loksabha Election : मराठवाड्यात कुणाची हवा? भाजपला कुठंं-कुठं फटका बसणार? वाचा तज्ज्ञांचं मत

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सन 1984 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिला. 1984 मध्ये काँग्रेसचे मदन पांडे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसची लाट होती. काँग्रेसने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. यानंतर मात्र काँग्रेसच्या हातून हा मतदारसंघ गेला तो अजून तरी मिळालेला नाही.

योगी आदित्यनाथांचं एकहाती वर्चस्व

सन 1989, 1991 आणि 1996 च्या निवडणुकीत गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांनी विजय मिळवला. महंत अवैद्यनाथ यांचा उत्तराधिकारी झाल्यानंतर योगी आदित्यनाथ 1998 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. ते विजयी देखील झाले. यानंतरच्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या समोर विरोधकांना पर्याय देता आला नाही. सन 2014 पर्यंत ते या मतदारसंघातून सातत्याने विजयी होत आले.

पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासदारकी सोडली. यानंतर ज्या पोटनिवडणूका झाल्या त्यात समाजवादी पक्षाच्या प्रवीण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र शुक्ल यांचा पराभव केला. परंतु खासदारकीचा आनंद सपाला जास्त दिवस टिकवता आला नाही. काही काळानंतर प्रवीण निषाद हेच भाजपात सामील झाले. भाजपच्या तिकिटावर त्यांनी संत कबीरनगर येथून त्यांनी निवडणूक जिंकली.

BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या ‘मोदी की गॅरंटी’ जाहीरनाम्यात काय काय?

रवी किशन यांचा करिश्मा चालला

सन 2019 च्या निवडणुकीच्या आधी रवी किशन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. पक्षाने त्यांना तिकीट दिले आणि रवी किशन तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी काँगेसच्या रामभुआल निषाद यांचा पराभव केला. यावेळच्या निवडणुकीत भाजप विकासकामे आणि मोदींच्या गॅरंटीवर मते मागितली तर इंडिया आघाडीने भाजपवर घणाघाती टीका करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. आता जनता कुणाच्या बाजूने कौल देणार याचं उत्तर चार जूनलाच मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज