Ayodhya Ram Mandir सोहळ्यानंतर राज्यातील राम मंदिरांमध्ये गर्दी वाढली; दानात दीडपट वाढ

Ayodhya Ram Mandir सोहळ्यानंतर राज्यातील राम मंदिरांमध्ये गर्दी वाढली; दानात दीडपट वाढ

Ayodhya Ram Mandir inauguration effect on states Ram Mandir : 22 जानेवारी 2024 रोजी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्येमध्ये ( Ayodhya Ram Mandir ) विधिवत प्राणप्रतिष्ठा ( inauguration ) झाली. भव्य दिव्य असं प्रभु श्रीरामांचं मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यानंतर अयोध्येतील भाविकांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली त्याचाच परिणाम राज्यातील राम मंदिरांवर ( states Ram Mandir ) देखील झाला आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज्यातील राम मंदिरांमध्ये देखील भाविकांची गर्दी वाढली असून दानामध्ये तब्बल दीडपट वाढ झाली आहे.

Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’बाबत 3 मोठी अपडेट समोर; एक नव्हे तीन भागांत…

यासाठी राज्यातील काही राम मंदिरांच्या दानपात्राचे माहिती घेतली असता, 2023 यावर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्या तुलनेत 2024 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये आलेलं दान हे दीडपटीने वाढलं आहे. 2023 मध्ये राज्यातील प्रमुख दहा राम मंदिरांच्या दानपात्रात सुमारे 54 लाख दान पडलं होतं. तर 2024 मध्ये हे दान जवळपास 79 लाखांच्या घरात गेलं आहे.

फडणवीसांच्या ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसीवर भारी पडणार पवारांचा डाव? माळशिरसचा बडा नेता भेटीला

यामध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. त्यानंतर या मंदिरात भाविकांची संख्या दुप्पट झाली. या अगोदर रामजन्मोत्सव तसेच इतर सणांच्या वेळीच भाविकांची गर्दी मोठी असायची. मात्र आता या मंदिरामध्ये महिन्याला सरासरी 40 ते 60 हजार असणारी भाविकांची संख्या तब्बल 70 ते 80 हजारांवर पोहोचली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज