नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ; सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, रोख कुणाकडं?

नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ; सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, रोख कुणाकडं?

RSS Chief Mohan Bhagwat :  गेली दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभेचा रणसंग्राम आता कुठं शांत झाला आहे. मागील काळात लोकसभा विजयाचं गणित डोळ्यासमोर ठेऊन देशातील वातावरण अनेक बाजूंनी ढवळून निघाल आहे. (Mohan Bhagwat ) यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेकसह अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत. मात्र, या काळात झालेली चिखलफेक ही समाजात फूट पाडणारी होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरच आता (RSS Chief) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे.

भाषणांची पातळी घसरलेली   Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे तर पंडितांनी निर्माण केल्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. या निवडणुकीदरम्यान सर्व मर्यादा पार करण्यात आल्या असल्याचं थेट भाष्य त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे. नागपूरमध्ये एका आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदींना लक्ष्य केल्याची चर्चा

काही कारण नसताना संघाला काही प्रकरणामध्ये ओढण्यात आलं असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. तसंच काही लोकांच्या भाषणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याची भावनाही व्यक्त केली. दरम्यान, मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संघ नाराज असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरू आहे. त्यातच मोहन भागवत यांनी नेत्यांचे कान टोचले असल्याने त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये जोरदार सुरू आहे.

सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या  मोदी अन् भागवतांच्या भेटीचा तपशील द्या; आंबेडकरांचं खुलं चॅलेंज

सर्वानुमते आणि लोकांना सोबत घेऊन काम करणं ही भारताची पंरपरा राहिली आहे. निवडणुकीदरम्यान स्पर्धा नक्कीच आवश्यक आहे, पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या अशी खंत मोहन भागवत यांनी बोलून दाखवली. दोन्ही पक्षांकडून असं कृत्य झालं आहे, असं देखील मोहन भागवत म्हणाले आहेत. पण, त्यांचा रोख पंतप्रधान मोदींकडे असल्याचा दावा अनेक जाणकारांकडून होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज