Death threat to CM Yogi Adityanath : मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच मारून टाकेल; योगींच्या सुरक्षेत वाढ

Untitled Design   2023 04 25T121328.462

Death threat to Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धमक्या देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर सीएम योगी यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यामुळं युपी एटीएससह सर्व यंत्रणा ह्या सतर्क झाल्या आहेत.

योगी आदित्यनाथ यांना धमक्या मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याविरूध्द कलम ५०६ आणि ५०७ आयपीसी आणि ६६ आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, मुख्यमंत्री योगी यांना 23 एप्रिल रोजी रात्री 8:22 वाजता यूपी-112 या नंबरवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. हा मेसेज XXXXX0148 या मोबाईल क्रमांकावरून आला आहे. या मेसेजमध्ये ‘मी मुख्यमंत्री योगी यांना लवकरच मारून टाकेल’ असं म्हटलं होतं. हा धमकीचा मेसेज संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी पहिल्यांदा पाहिला होता. त्यानंतर त्यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट काढून तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना या धमकीची माहिती दिली. योगीं आदित्यनाथ यांना मिळालेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या योगींच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुध्द गुन्हा नोंदवून पोलीस धमकी कोणी दिली, याचा शोध घेत आहेत.

बारसू मध्ये रिफायनरी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनीचं पत्र लिहलं होत, उदय सामंत यांचं ठाकरे गटाला उत्तर 

यापूर्वीही धमक्या आल्या होत्या
यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना अनेक धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्येही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यानंतर लखनऊच्या सायबर सेलने राजस्थानमधील मेवात येथून सरफराज नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याने डायल 112 च्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेशही पाठवला होता. या प्रकरणी 2 ऑगस्ट रोजी लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीएम योगींना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. लखनौच्या आलमबाग भागात राहणारे देवेंद्र तिवारी यांच्या घरी एका बॅगेत धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आणि देवेंद्र तिवारी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

 

Tags

follow us