Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?
Pakistan News : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान (Pakistan News) पीपल्स पार्टी संसदेत बजेट सादर होण्याच्या आधी किंवा नंतर सरकारमध्ये सहभागी होणार नाही. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सत्ताधारी शाहाबाज शरीफ यांच्या पक्षाकडून पीपीपीला मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. काही मंत्रिपदे देण्याची तयारीही सत्ताधारी पक्षाने दाखवली होती.
पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत पीपीपीने सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही. या बैठकीत बिलावल भुट्टो यांनी गहू खरेदी बंधनकारक करावी अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दुसरीकडे अशी चर्चा होती की दोन्ही पक्षांमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. बिलावल पुन्हा विदेश मंत्री म्हणून शपथ घेतील असे सांगितले जात होते. सुरुवातीला बिलावल भुट्टो सरकारमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नव्हते. नंतर मात्र तयार झाले होते. पीपीपी पक्ष सरकारमध्ये केव्हा सहभागी होईल याचे नियोजन सुरू असल्याचाही दावा मध्यंतरी करण्यात आला होता.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला प्रधानमंत्री शाहबाज शरीफ आणि बिलावल भु्ट्टो यांनी पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानसाठी राज्यपालांची नावे निश्चित करण्यासाठी भेट घेतली होती. एका अधिकृत निवेदनानुसार या दोन्ही नेत्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. याआधीच्या शरीफ सरकारमध्ये बिलावल भुट्टो होते. यंदाही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या सरकारमध्ये ते सहभागी होतील अशा चर्चा होत्या. परंतु, भुट्टो आता सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत हे स्पष्ट होत आहे. परंतु, यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही.
यानंतर एका पीपीपी नेत्याने सांगितले की सत्ताधारी पक्षाला जरी वाटत असले की पीपीपीने सरकारमध्ये सहभागी व्हावे परंतु, या मुद्द्यावर पक्षाने आपल्या जु्न्या भूमिकेत बदल करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. आता बजेटआधी किंवा बजेटनंतर पीपीपी सरकारमध्ये सहभागी होईल अशी चर्चा सुरू आहे परंतु या चर्चांत काहीच तथ्य नाही असे या नेत्याने स्पष्ट केले.
Champions Trophy साठी पाकिस्तानला न येण्याचे परिणाम भोगावे लागणार; माजी क्रिकेटपटूचा भारताला इशारा