मोठी बातमी! वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली, 7 जण बुडल्याची माहिती

मोठी बातमी! वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली, 7 जण बुडल्याची माहिती

Storm In Ujani Dam : पुणे (Pune) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, वादळी वाऱ्यामुळे इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळाशी होऊन करमाळा तालुक्यात जाणारी प्रवाशी वाहतूक बोट उजनी धरण (Ujani Dam) पात्रात बुडाली आहे. या धक्कादायक घटनेमध्ये सात जण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर पोहत एकाने आपला जीव वाचवला आहे.

माहितीनुसार, आज संध्याकाळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे ही बोट जात होती. मात्र सायंकाळी सहाच्या दरम्यान उजनी धरण पात्रात वादळी वाऱ्यामुळे ही बोट पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बोटीमध्ये तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली आणि एक बोट चालक असे एकूण 8 जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत मात्र 2 तासानंतरही अद्याप बुडालेल्या एकाचाही शोध लागलेला नाही.

तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील X वर ट्विट करत पुणे जिल्हाधिकारी यांना घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी, ता. इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली. या घटनेत काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परंतु येथे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी पुणे यांना विनंती आहे की आपण याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.

पुण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सदर घटना अतिशय गंभीर असून येथील मदत आणि बचाव कार्याचा मी सातत्याने आढावा घेत आहे. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. बेपत्ता असणारे सर्वजण सुखरुप असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube