‘त्या’ मुलामुळे माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली’; पुणे अपघातानंतर आमदार पत्नीने सांगितली कटू आठवण

‘त्या’ मुलामुळे माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली’; पुणे अपघातानंतर आमदार पत्नीने सांगितली कटू आठवण

Pune Porsche Accident : दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या (Pune Porsche Accident) अपघातात दोन निष्पाप लोकांचा जीव गेला. हा अपघात पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अगरवाल यांच्या  (Porsche) अल्पवयीन आणि मद्यधुंद मुलाकडून घडला. यात पोलिसांनी मुलाला अटक केली, न्यायालयात हजर केले. पण अवघ्या काही तासांतच त्याची जामिनावर सुटकाही झाली. त्यामुळे पुण्यात संतापाची (Pune Accident) लाट उसळली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनीही या अपघातानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे.

 

कल्याणीनगर येथील कार अॅक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे.

पुणे पोलिसांच्या ‘पाच’ चुका पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी प्रकरण शेकलं!

वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा बळी गेला. त्यांची कुटुंबं उद्धवस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे सोनाली तनपुरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची सूत्र हातात घेतली आहे. कोझी आणि ब्लॅक पबवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून येथील दारूच्या (Alcohol) साठ्यासह अन्य साहित्य सील करण्यास सुरूवात करण्यात आली असून, अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केल्याप्रकरणी कोझी अन् ब्लॅक पब सील करण्यातआले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज