Kalyani Nagar Accident : बिल्डर विशाल अग्रवालसह बार मालक, मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

  • Written By: Published:
Kalyani Nagar Accident :  बिल्डर विशाल अग्रवालसह बार मालक, मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

पुणे : कल्याणीनगरमध्ये शनिवारी (दि.18) मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अलिशान पोर्शे  (Porsche) गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता बारचे मालक, मॅनजरसह याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident Five People Arrested)

Pune Accident News : पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…

फरार बिल्डरला अटक

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे.

बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा

मुलगा अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निष्काळजीपणाचा कळस! अपघातातील कार विनानोंदणीचीच रस्त्यावर

कुणाकुणाला झाली अटक

अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी तसेच मुंढवा येथील कोझी हॉटेलचे प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर आणि ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप रमेश सांगळे, जयेश सतीश बोनकर यांच्यासह मुलाचे वडिलांना अटक करण्यात आली आहे.

Pune Accident : होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो; बिल्डर पुत्राची पोलिसांना कबुली

काय म्हणाले पुण्याचे पोलीस आयुक्त

या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असून, याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे काल (दि.20) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते. तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासात मुलाच्या वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube