Pune Accident : अजितदादा पुण्याचे की बिल्डरचे पालकमंत्री? दादा गप्प का? राऊतांचे टोचणारे सवाल
Sanjay Raut on Pune Porsche Car Accident : पुण्यातील अपघात प्रकरण देशात गाजत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच जाब विचारला आहे. एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का. अजित पवार अजूनही झोपलेले आहेत का. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत की बिल्डरचे. असे टोचणारे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.
अजित पवार पु्ण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटलांकडून जबाबदारी काढून पुणे जिल्ह्याची कमाम स्वतःच्या हाती घेतली. आता सगळ्या चुकीच्याच गोष्टींसाठी पुणे चर्चेत आहे मग अशा वेळी ते गप्प का आहेत? पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणे आणि लोकांच्या हत्या करणे हेच नवीन चलन होऊ पाहत आहे. पण या आरोपांवर उत्तरं देण्यासाठी आता पुण्यातील नागरिकांत नवा विश्वास जागवण्यासाठी मात्र पालकमंत्री कुठेच दिसत नाहीत.
पुणे पोर्श अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांची चौकशी होणार…
अजित पवार प्रत्येक विषयावर बोलत असतात. अगदी छोट्या घटनांवरही मीडियाला प्रतिक्रिया देत असतात. नियमितपणे पत्रकारांशी चर्चाही करतात. पुणे मेट्रोतून प्रवास करतात. सकाळी लवकर उठतात आणि सहा वाजताच दौराही करतात. त्यांचं म्हणणं आहे की ते एक अनुशासित व्यक्ती आहेत. ते जगाला नेहमीच सांगत असतात की चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.
आता या गोष्टींचं काय झालं. एका श्रीमंत व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का? अजित पवार अजूनही झोपलेलच आहेत का? असं वाटतंय की पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सोडून दिलीय. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत की बिल्डरचे पालकमंत्री आहेत? असे तिखट अन् टोचणारे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.
फडणवीसांनी उल्लेख केलेला राजकीय दबाव नेमका कुणाचा? पुणे अपघातप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल