Exclusive: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार? शरद पवारांना तर तसंच वाटतंय..
Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली. (Maharashtra Politics) त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाणार? यावर भाष्य केले आहे. नेमकं काय म्हणाले चला तर मग जाणून घेऊया…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटायचा. त्यांच्यात potential म्हणजेच संभाव्यता असं जाणवायचं. आता मला त्यांची धावपळ पूर्ण वेगळी वाटते. त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते. आम्ही दोघेही विधान परिषदेत होतो. गंगाधर फडणवीस (Gangadhar Fadnavis) नागपूर शहरातून होते. अतिशय मस्त असा माणूस, दिलखुलास यांचा हल्लीचा दृष्टीकोन मला वेगळाच दिसतो. (Maharashtra Politics) आणि मला असं वाटतं की, त्यांच्या इथल्या प्रशासनात आणि राज्यात फारसा रस राहिला नसावा, असं मला वाटतं. त्यांना कदाचित दिल्लीला जायचं असेल, केंद्रात जायचं असेल.
पक्षाच्या कामाला जायचं असेल, असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की, मी दोन स्वरूप पाहिले, की जे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माणसाच्या सरकारमध्ये ते मंत्री बनले. माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण जेव्हा मंत्री होते. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. नंतर शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. आणि ते माझ्या मंत्री मंडळात मंत्री झाले, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळं मी काय कमीपणा म्हणत नाही. पण शेवटी मुख्यमंत्रीपदावर तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला समजा ते पद मिळत नसेल. तर गाईड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टीकोन ठेवा. पण, तुम्हाला अन्य पदावर जाण्याची वेळ आली, तर सत्ता मिळते ना मग जातो. काय यातून प्रतिष्ठा राहत नाही.
विरोधी पक्षनेता बोलायला लागताच नेहरू मागे फिरले, अन्….; शरद पवारांनी सांगितला किस्सा…
पुढे त्यांना ‘पवारसाहेबांचा राजकीय इरा संपत आलेला आहे. या धाडसी विधानाबाबत विचारण्यात आले असता, ते थेटच म्हणाले की, संपेल म्हणाले… ते म्हणाल्याच्यानंतर आम्ही सरकार तिथे बदललं ना.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनवले? आम्हीच लोकांनी बनवले. त्यामुळे कुणाचा इरा संपला हे कळलं त्यांना. आणि नुसतंच कळलं नाही तर नव्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली. पण त्यांना मुख्यमंत्र्यांना मंत्री व्हावं लागलं. त्यामुळे कोणाचा संसार….लोक बोलून जातात… दुर्लक्ष करायचं असे ते यावेळी म्हणाले.
निवृत्ती देशमुख महाराजांचे कीर्तनाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, निवृत्ती देशमुख यांच्या कीर्तनाने समाजाचे प्रबोधन होते आणि ते शक्यतो प्रवासामध्ये येता- जाता ऐकायला मला आवडत. पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं अससमेन्ट काय? याविषयी त्यांना विचारण्यात आले, त्यावर ते थेट म्हणाले की, मला फारशी माहिती नाही. आणि आम्ही तस काम ही कधी एकत्र केले नाही. कधीतरी भेटतो. मात्र कशाला तरी गेलोय, एकदाच नाही गेलोय… निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो की काय? मराठा संघटनेची एक सभा होती, त्याची निमंत्रण वगरे देण्यासाठी गेला होतात का? असं विचारताच ते म्हणाले की, मी त्यांच्याकडे एकदा-दोनदा गेलो होतो. तस म्हणजे महाराष्ट्र शांत स्वभावाचा आहे. असा वादग्रस्त असं काही वाचलं नाही. आणि कोणी आमच्या सभेचा, फिरून बोलण्याचा असा एक अप्रोच वाटतो. असे ते यावेळी म्हणाले.