विरोधी पक्षनेता बोलायला लागताच नेहरू मागे फिरले, अन्….; शरद पवारांनी सांगितला किस्सा…
Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी पवारांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा एक किस्सा सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज राहावे; CM शिंदेंच्या सूचना
या मुलाखतीत नेहरूंचा किस्सा सांगताना पवार म्हणाले, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतांना एकदा संसदेत बोलते होते. त्यांचं बोलून झाल्यावरून विरोधी पक्षाचा एक मोठा नेता बोलायला उभा राहिला. नेहरू आपलं भाषण झाल्यावर बाहेर जायला निघाले होते. मात्र, विरोधी पक्षाचा नेता बोलतोय म्हटल्यावर नेहरू तसेच मागे फिरले आणि सभागृहात बसून त्यांनी विरोधी पक्षनेत्याचं संपूर्ण भाषण त्यांनी ऐकलं, असं पवार म्हणाले.
पुढं बोलतांना पवार म्हणाले, नेहरूंनी विरोधी पक्ष नेत्याचं भाषण ऐकलं. मात्र, मोदीतर फक्त विरोधकांवर टीका करतात. मोदी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींवर टीका करतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी अख्खा देश फिरला. त्यांना बालबुद्धी म्हणत मोदींनी टिंगल केली. परवा प्रधानमंत्री मोदींनी दोन तास, दहा मिनीटं संसदेत भाषण केलं. ते पंधरा मिनिटे देशातल्या प्रश्नांवर बोलले आणि दोन तास फक्त विरोधकांवर टीका केली. मी ही देशातील अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. मोदी आणि वाजपेयी यांच्याआधीच्या सर्वच सरकारांमध्ये मी होता. आम्ही कधीही मोदींसाराखी भूमिका घेतली नाही, असं पवार म्हणाले.
मोदींनी देशातल्या प्रश्नांवर बोलावं…
मोदी सभागृहात येत नाहीत. त्यांना बोलायचं असतं तेव्हाच ते सभागृहात येतात. महिनाभर जर अधिवेशन असेल तर महिन्याभरात मोदी दोन-तीनदाच सभागृहात येतात. आणि विरोधकांवर आगपाखड करतात. मोदींनी त्यांच्या समोर असलेल्या प्रश्नांवर बोललं पाहिजे, असा सल्लाही पवारांनी मोदींनी दिला.