राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज राहावे; CM शिंदेंच्या सूचना

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज राहावे; CM शिंदेंच्या सूचना

CM Eknath Shinde : मुंबई काल रात्रीसून सुरू असलेल्या पावसामुळं मुंबईची (Mumbai) तुंबई झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्चया पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेत.

…अन् किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले, शरद पवारांनी सांगितला प्रेरणादायी किस्सा 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

मोदी नेहरूंच्या धोरणानुसार सरकार चालवतात का?, शरद पवारांचा थेट सवाल 

नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये…
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईसह राज्यात पाऊस सुरू आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्यात. यातून मार्ग काढण्यासाठी लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यााकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षितेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळं नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंबईसह राज्यातील सर्व टीम अलर्ट मोडवर आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अधिकारी स्पॉटवर आहेत. सगळे एकत्र काम करत आहेत. ही राजकारणची नसून सामान्य जनतेला मदत करण्याची वेळ आहे. सामान्य जनतेला अधिकाधिक मदत कशी मिळेल, हे पाहिलं जातं आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube