मोदी नेहरूंच्या धोरणानुसार सरकार चालवतात का?, शरद पवारांचा थेट सवाल
Sharad Pawar On PM Modi : भाजप (BJP) नेत्यांकडून कायम देशाचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर टीका केली जाते. कॉंग्रेसने 70 वर्षात काय केलं? असा करत नेहरूंवर टीका केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) अनेकदा नेहरूंवर घणाघाती टीका केली. भाजपकडून आणि मोदींकडून नेहरूंवर होत असलेल्या टीकेला आता शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राहुल गांधींबद्दल शरद पवारांचं मत काय?, लेट्सअप मराठीच्या महामुलाखतीत केला ‘हा’ मोठा दावा
शरद पवारांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी मोदींवरही टीका केली. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला जनतेनं 240 जागांवर रोखलं. त्यामुळे मोदींचा औरा कमी झाला. निकालानंतर मोदी संविधानासमोरही नतस्तक झाले होते. त्यामुळं मोदी बदलले का? असा सवाल पवारांना विचाण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, मी परवा मोदींचं लोकसभा आणि राज्यसभेतलं भाषणं ऐकलं. मला अजिबात मोदींमध्ये बदल झालेला दिसत नाही. याउटल ते अतिशय टोकाची भूमिका घेत आहेत. ते आजही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींवर टीका टीका करत असतात. नेहरूंना जाऊन कितीतरी वर्ष झाली. आज त्यांच्यावर टीका करायचं कारणच काय? नेहरूंच्या धोरणानुसार मोदी सरकार चालवतात का? असा सवाल पवारांनी केला.
Bhagyashree Limaye : अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा मोहक अंदाज
मोदींनी विरोधकांवर नाही प्रश्नांवर बोलावं…
पुढं बोलतांना पवार म्हणाले, प्रधानमंत्री मोदींनी दोन तास, दहा मिनीटं संसदेत भाषण केलं. ते पंधरा मिनिटे ते देशातल्या प्रश्नांवर बोलले आणि दोन तास फक्त विरोधकांवर टीका केली. मोदींनी त्यांच्या समोर असलेल्या प्रश्नांवर बोललं पाहिजे, असा सल्लाही पवारांनी दिला. मीही देशातील अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. मोदी आणि वाजपेयी यांच्याआधीच्या सरकारांमध्ये मी होता. आम्ही कधीही मोदींसाराखी भूमिका घेतली नाही, असं पवार म्हणाले.
Team India: बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटींचं वाटप होणार; कुणाला किती पैसे मिळणार?
मोदीमध्ये संसदेविषयी आदर दिसत नाही…
मोदींनी राहुल गांधींवरही बालबुध्दी म्हणत टीका केली. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. मोदीजी पदाची प्रतिष्ठा न ठेवता केवळ टीका करतात. त्यांनी पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. महिनाभर जर अधिवेशन असेल तर महिन्याभरात मोदी दोन-तीनदाच सभागृहात येतात. संसदेविषयी आणि विधीमंडळाविषयी जी आदराची भावना आणि आस्थेचा भूमिका पंतप्रधांकडे असायला हवी, तो मोदींमध्ये दिसत नाही, असंही पवार म्हणाले.