Bharuch Viral Video : नोकरीसाठी चेंगराचेंगरी, गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका, पहा धक्कादायक व्हिडिओ

Bharuch Viral Video : नोकरीसाठी चेंगराचेंगरी, गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका, पहा धक्कादायक व्हिडिओ

Bharuch Viral Video : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच सध्या देशात बेरोजगारी किती आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ गुजरातमधील (Gujarat) भरुचमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल (Bharuch Viral Video) होत आहे.

तर दुसरीकडे या व्हिडिओवरून काँग्रेसने (Congress) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माहितीनुसार, गुजरातमधील भरूचमध्ये एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या नोकरीसाठी हजारो उमेदवार आल्याने एकच गोंधळ उडाला.

भरूच येथील अंकलेश्वरमधील एका खासगी कंपनीकडून नोकरीसाठी ही मुलाखत घेण्यात येत होती. मात्र या ठिकाणी नोकरीसाठी हजारो उमेदवार आल्याने मुलाखतीसाठी प्रथम प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुणांच्या जमावाने धक्काबुक्की केली परिणामी हॉटेलच्या बाहेरील रेलिंग तुटल्याने अनेक तरुण खाली पडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर (Gujarat Model) टीका केली आहे. काँग्रेसने ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्या टीका केली आहे.

काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल. गुजरातमधील भरुचमध्ये एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी बेरोजगारांची मोठी गर्दी जमली होती. हॉटेलची रेलिंग तुटून गुजरात मॉडेलचा पर्दाफाश झाला. नरेंद्र मोदी हे बेरोजगारीचे मॉडेल संपूर्ण देशावर लादत आहेत. अशी टीका काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अंकलेश्वरमधील एका हॉटेलमध्ये खासगी कंपनीकडून 5 जागांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या जागांवर कंपनीला रासायनिक उद्योगाचा अनुभव असलेल्या तरुणांची गरज होती.

कंपनीला यासाठी रासायनिक विषयातील बीई पदवी आणि 6 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक होता. मात्र या पाच जागांसाठी एकाच वेळी हजार उमेदवार आल्याने एकच गोंधळ उडाला.

पोर्श कार अपघात प्रकरणात अमितेश कुमारांवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

माहितीनुसार, या मुलाखतीमध्ये प्लांट ऑपरेटरसाठी, सुपरवायझरसाठी, मेकॅनिकल फिल्टरच्या रिक्त पदांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली होती. आयटीआय पास, B.Sc.-MSc, डिप्लोमा इन केमिकल पदवी,  ITI पास या उमेदवारांची मुलाखत कंपनीकडून आयोजित करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज