उद्या मतदान, क्रॉस व्होटिंगची भीती; चार पक्षांना धाकधूक, शरद पवार अन् काँग्रेस टेन्शन फ्री!

उद्या मतदान, क्रॉस व्होटिंगची भीती; चार पक्षांना धाकधूक, शरद पवार अन् काँग्रेस टेन्शन फ्री!

MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर (Elections 2024) राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र (MLC Election 2024) त्याआधीच महाराष्ट्रातलं राजकारण विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघालंं आहे. विधानपरिषदेत 11 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे. मतांची फूट टाळण्यासाठी राजकीय पक्षांचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र, यातील दोन पक्षांनी असं काहीच केलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MLC Election : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? आज होणार पिक्चर क्लिअर

विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले आहे. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती आहे. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. आता हे आमदार मतदानाच्या वेळीच सभागृहात येतील.

चार पक्षांच्या आमदारांचा हॉटेलात मुक्काम

संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही. शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

तरी देखील फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. भाजपने त्यांच्या आमदारांना ताज प्रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच शिंदे गटाने ताज लँड, शिवसेना ठाकरे गटाने आयटीसी ग्रँड मराठा आणि अजित पवार गटाने त्यांच्या आमदारांना हॉटेल ललितमध्ये ठेवले आहे.

12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान! महायुती-मविआमध्ये मतांसाठी रस्सीखेच, कुणाचं किती संख्याबळ?

काँग्रेस अन् शरद पवार टेन्शन फ्री

या निवडणुकीत एकूण 274 मतदार आहेत. निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसकडे 37 मते आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार येण्यात काहीच अडचण नाही. उलट त्यांच्याकडील जास्तीची मतं मविआच्या दुसऱ्या उमेदवाराकडे वळवली जाणार आहेत. ही जास्तीची मते ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर यांना मिळण्याची तयारी आहे.

मते फुटली तरी काँग्रेसला टेन्शन नाही. त्यामुळे काँग्रेसने हॉटेल पॉलिटिक्स टाळलं आहे. शरद पवार गटाकडे 12 मतं आहेत. मात्र त्यांनी या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. शरद पवार गटाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनाही काही टेन्शन नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube