जे झालं ते झालं, सुर्यकुमारने… अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! मोहसीन नक्वींनी मागितली माफी

Asia Cup 2025 मध्ये टीम इंडीयाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ती ट्रॉफी परत नेली. मात्र आता नक्वींनी माफी मागितली.

Asia Cup 2025

Asia Cup 2025 ACC Chief Mohsin Naqvi Apologize to India Asia Cup 2025 Trophy return : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत नववे आशिया कप विजेतेपद पटकावले. यानंतर पुरस्कार सोहळा वादग्रस्त ठरला. त्यानंतर पहलगाम हल्ला आणि अगोदरच्या समान्यांमध्ये पाकच्या खेळाडूंनी दिलेल्या चिथावणीच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी पीसीबी आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. ट्रॉफीशिवाय विजय साजरा केला. नव्की यांनी देखील मैदानात टीम इंडीयाला द्यायला आणलेली ट्रॉफी परत नेली होती. मात्र त्यानंतर आता मोहसीन नक्वींनी भारताची माफी मागितली आहे.

काय म्हणाले मोहसीन नक्वी?

मंगळवारी दुबईमध्ये अशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. त्यामध्ये भारतीय संघाने नाकारलेल्या ट्रॉफीचा मुद्दा समोर आला. त्यावर बोलताना नक्वी यांनी म्हटलं की, जे झालं ते व्हायला नको होतं. पण आपल्याला आता नवी सुरूवात करायला हवी. सुर्यकुमार यादवने स्व: येऊन ट्रॉफी घेऊन जावी. तसेच त्यांनी माफी देखील मागितली.

दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ

दरम्यान पाकिस्तानमध्ये नक्वी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने नव्की यांना विरोध करत त्यांनी पीसीबी आणि एसीसी अध्यक्ष पद सोडावं अशी मागणी त्याने केली आहे. दरम्यान त्यांच्या या माफीवर माजी क्रिकेटर किर्ती आझाद यांनी म्हटलं आहे की, त्यांनी माफी मागितली अथवा नाही मागितली हा वेगळा विषय आहे. पण ट्रॉफी त्यांची वैयक्तिक संपत्ती नव्हती जी ती परत घेऊन गेले. हे तर असं झालं की, आऊट झाले तर बॅट आणि बॉल दोन्ही घेऊन गेले.

follow us