Najam Sethi : पीसीबी प्रमुखांच्या ट्विटने अशिया चषकापूर्वीच पाकिस्तानात खळबळ…

Najam Sethi : पीसीबी प्रमुखांच्या ट्विटने अशिया चषकापूर्वीच पाकिस्तानात खळबळ…

Najam Sethi : आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.

शहाजीबापू पाटलांसाठी 2024 ‘नॉट ओक्के’; शेकाप बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार

यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया चषकाचे यंदाचे यजमनापद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी नकार दिल्यानंतर बराच काळ वाद सुरू होता. एका टप्प्यावर स्पर्धा होणार की नाही यावरच प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. त्यावर संयुक्त अरब अमिरात सारख्या तटस्थ ठिकाणी आयोजन करण्यावरही चर्चा झाली. मात्र त्यावर आता तोडगा निघाला आहे. या दरम्यान आता अशिया चषकापूर्वीच पाकिस्तानात खळबळ निर्माण झाली आहे. कारण पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी राजीनामा दिला आहे. (Pakistan Cricket Board Chief Najam Sethi)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना…

अगोदर पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी पुढील बोर्डच्या चेअरमन पदाच्या शर्यतीतून स्वतःला बाजूला केले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या पीसीबी प्रमुख पदाचा देखील राजीनामा दिला आहे. ते 21 जूनला त्यांचा कार्यकाळ संपणार होता. त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते अंतरिम व्यावस्थापन समितीचे प्रमुख होते. ते डिसेंबरपासून या पदावर होते. सेठी यांनी ट्विट करत ही माहिती दिली त्यांच्या या ट्विटने अशिया चषकापूर्वीच पाकिस्तानात खळबळ निर्माण झाली आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले सेठी?

आपल्या ट्विटमध्ये नजम सेठी म्हणाले की, ‘सर्वांना सलाम! मला असिफ झरदारी आणि शेहबाज शरीफ यांच्यातील वादाचे कारण व्हायचे नाही. ही अस्तिरता आणि अनिश्चितता पीसीबीसाठी चांगली नाही. तसेच मला अशा परिस्थितीत पीसीबीचं अध्यक्षही व्हायचं नाही. सर्वांना शभेच्छा.’ त्यामुळे आता झका अशरफचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घटनेचा आगामी आशिया कपवर परिणाम होऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube