शहाजीबापू पाटलांसाठी 2024 ‘नॉट ओक्के’; शेकाप बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार

शहाजीबापू पाटलांसाठी 2024 ‘नॉट ओक्के’; शेकाप बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार

News Arena India Survey : “काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय…” शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी वर्षभरापूर्वी गुवाहटीमध्ये असताना फोनवर बोलताना हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर सांगोल्यापुरते मर्यादित असलेले आमदार पाटील फक्त महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात आणि जगातही प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच वाक्यातून विरोधकांनी ’50 खोके-एकदम ओके’ ही जगप्रसिद्ध घोषणा दिली. (News Arena India Survey Sangola Assembly Constituency 2024 MLA Shahajibapu Patil)

मात्र आता हे आमदार शहाजीबापू पाटील 2024 च्या निवडणुकीत पराभूत होणार असल्याचा अंदाज आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येणार असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यामुळे पाटील यांच्यासाठी 2024 चा कार्यक्रम ‘नॉट ओके’ असचं म्हणावं लागणार आहे.  न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती.

News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

सांगोला आणि शेकाप हे समीकरण मागच्या अनेक निवडणुका तयार झाले होते. या मतदार संघावर शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे 50 वर्षे एक हाती वर्चस्व होते. 1995 सालचा अपवाद वगळता 1972 पासून त्यांनी सलग 11 वेळा निवडून येण्याचा त्यांनी विक्रम नोंदवला होता. यंदा वयोमानामुळे देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेकापने भाऊसाहेब रूपनवरांना उमेदवारी जाहीर केली होती.

News Arena India Survey : रोहित पवारांना धोबीपछाड देणे राम शिंदेंना अवघडच

मात्र ऐनवेळी रूपनवरांऐवजी गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज रूपनवरांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही सेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला. अखेर अटीतटीच्या लढतीत सेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी शेकापच्या गडावर भगवा फडकवला. मात्र आता पुन्हा एकदा सांगोल्याची जागा शेकापच्या ताब्यात येणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काय स्थिती?

या सर्व्हेनुसार, पक्षनिहाय वर्तविण्यात आलेल्या अंदाजामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 123-129 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा मिळणार असल्याचं म्हंटलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला 55 – 56 जागा आणि काँग्रेसला 50-53 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 17-19 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. तर इतर 12 जागांवर छोटे पक्ष आणि तेलंगणाच्या बीआरएस पक्षाही महाराष्ट्रात एन्ट्री मिळविणार असल्याचे भाकीत या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube