News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गटात विभागलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दाखवले आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील, तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्व्हेत वर्तवला आहे.

या सर्व्हेत विभागनिहाय आणि जिल्हानिहाय अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील 62 जागापैकी भाजपला 30-31 जागा, तर काँग्रेसला 20-21 जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीला 2 जागा, शिंदे गटाला 5 जागा तर ठाकरे गट खातेही उघडत नसल्याचे दाखवले आहे. इतर 4 जागा मिळवतील असा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपाला 8, काँग्रेसला 3 तर शिंदेंच्या सेनेला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे. सर्व्हेत काटोल मतदासंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांची जागा धोक्यात असल्याचे दाखवले आहे तर काँग्रेस नेते सुनिल केदार आणि नितीन राऊत यांनी आपले गड राखल्याचे दाखवले आहे.

सावनेर – विधानसभा मतदारसंघ
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमध्ये काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी सावनेर मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे.‘न्यूज एरिना इंडिया’सर्व्हेत सुनिल केदार यांनी आपली जागा राखतील असे दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी सुनिल केदार यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 18 जागा बिनविरोध काढल्या होत्या. भविष्यात काँग्रेस कार्यकारणीत त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुनिल केदार यांचे सावनेर मतदारसंघात पारडे जड मानले जात आहे.

News Arena India Survey : जळगाव भाजपचच! पण, एकनाथ खडसेंसाठीही गुडन्यूज

नागपूर उत्तर – विधानसभा मतदारसंघ
नागपूर उत्तर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एकेकाळी रिपाईचे येथे वर्चस्व होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि बसपाच्या मतविभाजनाचा भाजपाला फायदा झाला. त्यानंतर 2019 ला बसपाचे किशोर गजभिये यांना काँग्रेमध्ये घेऊन नितीन राऊत आपली ताकद सिद्ध केली होती. मोठ्या फरकाने विजयी झाले होते. आता ‘न्यूज एरिना इंडिया’सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन राऊत नागपूर उत्तरची जागा राखतील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नितीन राऊत यांना काँग्रेसमधील कलह आणि मित्र पक्षांची मोट बांधण्याचे आव्हान आगामी निवडणुकीत असणार आहे.

News Arena India Survey : भुजबळ, झिरवळांचे गड मजबूत, कांदेंना धक्का; नाशकात राष्ट्रवादी भाजपला वरचढ?

काटोल – विधानसभा
‘न्यूज एरिना इंडिया’सर्व्हेतून काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यासाठी सभा देखील घेतली होती. विदर्भातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना काही काळ जेलमध्ये जावे लागले होते. त्यामुळे त्यांना मतदारसंघाकडे लक्ष देता आले नव्हते. 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube